Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

7 Dec 2024, 13:12 वाजता

16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन?

 

State Legislature Session 2024 : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय.. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होण्याची शक्यात आहे.. दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्याता आहे असं अजित पवार म्हणालेत.. 

7 Dec 2024, 12:12 वाजता

'वेडवाकडं वागल्यास बंदोबस्त करणार', निलेश राणेंचा इशारा

 

Nilesh Rane : विरोधकांच्या अॅक्शनला रिअॅक्शन मिळणार, असा इशारा शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दिला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्याशी वेडवाकडं वागलात तर बंदोबस्त करणार, असं ते म्हणालेत. विरोधक नीट वागले नाहीत तर माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका, असंही निलेश राणे म्हणालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

7 Dec 2024, 11:45 वाजता

विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग

 

Mahavikas Aghadi : विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग..शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर

7 Dec 2024, 11:25 वाजता

 गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर?

 

Gulabrao Devkar : जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुलाबरावांनी देवकरांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतलीय. या भेटीत पक्षप्रवेशनाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी जळगाव मध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटलांकडून पराभव झाला होता.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Dec 2024, 10:44 वाजता

भंडाऱ्यात मोबाईलच्या स्फोटात मुख्याध्यापकाचा मृत्यू

 

Bhandara : जर तुम्ही मोबाईल खिशात ठेवून फिरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी... खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झालाय.. तर एक गंभीर जखमी झालाय... भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडलीये.. सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे.. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला.. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली.. यात ते भाजले.. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झालाय.. 

 

7 Dec 2024, 10:13 वाजता

विधान परिषदेला सभापती मिळणार?

 

State Legislature Session 2024 : विशेष अधिवेशनात विधान परिषद सभापती निवडीची शक्यता..गेल्या दोन वर्षांपासून सभापती पद रिक्त...सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड...अध्यक्षांसोबत परिषदेच्या सभापतींचीही निवड होण्याची शक्यता

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Dec 2024, 09:57 वाजता

कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर

 

Eknath Shinde : कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुस-या क्रमांकावर...एकनाथ शिंदेंना नागपुरातील देवगिरी बंगला..हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप..अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम...शिंदेंकडं दिल्या जाणा-या खात्यांबाबत उत्सुकता

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Dec 2024, 09:05 वाजता

फडणवीस मंत्रिमंडळ नव्या चेहऱ्यांचं असणार?

 

State Cabinet : फडणवीस मंत्रिमंडळ नव्या चेह-यांचं असणार?..ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळाबाहेर राहणार?..जुन्या जाणत्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याची शक्यता...महाराष्ट्र भाजपातही मार्गदर्शक मंडळ?..कुणाकुणाचा ज्येष्ठत्वानुसार पत्ता कट होणार

7 Dec 2024, 08:39 वाजता

ठाणे आणि भिवंडीतील 10% पाणीकपात मागे

 

Thane Water Cut Withdraw : ठाणे आणि भिवंडीकरांसाठी आनंदाची बातमी.. मुंबईसह ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आलीये.. या शहरांना पाणीपुरवठा करणा-या पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम'मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यामुळे मुंबई महापालिकेने लागू केलेली १० टक्के पाणीकपात शुक्रवारी मागे घेतली. महापालिकेतर्फे ठाणे आणि भिवंडी परिसरातही पाणीपुरवठा करण्यात येतो. अशात ही पाणीकपात रद्द केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांनाही दिलासा मिळालाय.. पिसे न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये 30 नोव्हेंबर रोजी बिघाड झाला होता... महानगरपालिकेने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम 1 आणि 2 डिसेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आले. पाणीपुरवठा यंत्रणा स्थिर झाल्यानंतर शुक्रवार 6 डिसेंबरपासून ही पाणीकपात मागे घेण्यात आलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

7 Dec 2024, 08:23 वाजता

जळगाव पालिकेची पाईपलाईन चोरीला

 

Jalgaon :  जळगाव महापालिकेच्या किरणा पंपिंग ची ब्रिटिश कालीन जुनी पाईपलाईन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर यांचे पती व महापालिकेचे विरोधी पक्षनेते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर महापालिका पाणीपुरवठा विभागाने जेसीबी द्वारे संपूर्ण पाईपलाईनची तपासणी केली असता यात 1 हजार 260 मीटर लांबीचे पाईप चोरीला गेल्याचे आढळून आलं. या पाईपची किंमत सुमारे सव्वा कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे