7 Dec 2024, 22:16 वाजता
EVM विरोधात जनतेत असंतोष - सुप्रिया सुळे
Supriya Sule On EVM : राज्यातील जनतेत EVMबाबत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे EVM ऐवजी बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी जनतेकडून होत आहे. या मागणीवर विचार करायला काय हरकत आहे, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसंच EVMविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या मुद्द्यावर सोमवारी निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
7 Dec 2024, 22:05 वाजता
निकालानंतर राज्यात उत्साहाचं वातावरण नाही - शरद पवार
Sharad Pawar : विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण दिसत नाही... मतांची आकडेवारी बघितल्यास आश्चर्य वाटतं.. त्यामुळे पराभव झाला तरी चिंता करायची नाही.. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय..
7 Dec 2024, 20:07 वाजता
बदलापूरमध्ये 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
Badlapur : बदलापूरच्या सोनिवली अदिवासी वाडीत उलट्या आणि जुलाबांमुळे 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.. इथल्या मिरकुटे कुटुंबातील 5 जणांना पाणी किंवा अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यापैकी 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. विशेष म्हणजे या कुटुंबावर करणी झाल्याचा संशय व्यक्त करत, आधी बदलापूर महापालिका रुग्णालयानं त्यांना दाखल करायला नकार दिला. मात्र आशआ सेविका समाजसेवकांनी समजावल्यानंतर रुग्णालयानं त्यांना दाखल करुन घेतलं. तर विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं आदिवासी वाडीत आरोग्य शिबीर घेऊन गावक-यांची तपासणी केली.
7 Dec 2024, 18:02 वाजता
हा निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान - फडणवीस
Devendra Fadanvis : जनतेनं ज्यांना निवडून दिलं ते लोकप्रतिनिधी शपथ घेत नाहीत, हा निवडून देणा-या मतदारांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Dec 2024, 17:20 वाजता
एकनाथ शिंदे विधान परिषद सभागृह नेते होणार?
Eknath Shinde : विधानपरिषदेचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे.. हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे हे कामकाज पाहण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभेचे महायुतीचे सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे कामकाज बघत आहेत.. मागील सरकारमध्ये फडणवीस हे विधान परिषदेचे सभागृह नेते होते तर एकनाथ शिंदे हे विधानसभेचे सभागृह नेते होते. त्यामुळे या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून विधानपरिषदेचे सभागृह नेते होण्याची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Dec 2024, 16:14 वाजता
बीडमधील रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा
Beed Hospital : बीडच्या अंबाजोगाईमधील स्वाराती रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये समोर आलीय.. महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं रुग्णालयास बनावट औषधीचा पुरवठा केल्याचं तपासणीमध्ये उघड झालंय.. याप्रकरणी ठाणे आणि गुजरातमधील चौघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. या बनावट औषध प्रकरणाचं गुजरात कनेक्शन असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत..
7 Dec 2024, 16:01 वाजता
शरद पवार उद्या मारकडवाडीच्या दौऱ्यावर
Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या सोलापुरातील मारकडवाडीचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी SP पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी EVMविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटून, त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत.
7 Dec 2024, 15:59 वाजता
शिवसेना UBT पक्षाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेतेपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळावं अशी मागणी भास्कर जाधव यांनी केलीय.. प्रथा परंपरेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं असंही भास्कर जाधव म्हणालेत.. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आमच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Dec 2024, 14:02 वाजता
जिंकल्यावर EVM चांगलं आणि हरलं की वाईट- अजित पवार
Ajit Pawar on EVM : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडसावलंय. जिंकल्यावर EVM चांगलं आणि हरलं की वाईट, असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. विरोधक काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात, उद्या शपथविधीचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे विरोधकांना उद्या शपथ घ्यावीच लागेल, असंही अजित पवार म्हणालेत.
7 Dec 2024, 13:46 वाजता
राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार-जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad on Rahul Gandhi : 'राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार'..आमदार जितेंद्र आव्हाडांची माहिती... राहुल गांधींच्या दौ-याचं नियोजन सुरू-नाना पटोले..सध्या दौरा निश्चित झाला नाही-पटोले