Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

9 Dec 2024, 13:02 वाजता

एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टोलेबाजी

 

Vidhansabha Eknath Shinde : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.  काही लोकांनी बहिष्कार टाकला असं म्हणत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंनी टोला लगावलाय

9 Dec 2024, 12:56 वाजता

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष

 

Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड झालीय. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून नार्वेकरांच्या निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांच्या कामाचं कौतुक केलंय. आणि नार्वेकरांनी सर्वांना न्याय देण्याचं काम केलंय असं वक्तव्य फडणवीसांनी सभागृहात केलंय 

9 Dec 2024, 11:56 वाजता

इंदापूरमध्ये कारचा अपघात, 2 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

 

Indapur Accident : इंदापूरमधील लामजेवाडीजवळ कारचा भीषण अपघात झालाय. कारमध्ये बारामतीतील 4 शिकाऊ वैमानिक पायलट होते.. भिगवणकडे जाताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय.. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत...

9 Dec 2024, 11:29 वाजता

मेट्रो 3 पुढच्या सहा महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत

 

Metro - 3 : मेट्रो 3 पुढच्या सहा महिन्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारेय. मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पुढच्यावर्षी जून ते जुलै पर्यंत सुरू होण्याची शक्यताय. या टप्प्यातील रुळांचे काम जवळपास पूर्ण झालंय. बीकेसी ते कफ परेड हा 20.9 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर एमएमआरसीने रुळांच्या उभारणीचं काम जवळपास 88 टक्के पूर्ण केलंय.  

9 Dec 2024, 11:01 वाजता

नांदेडमध्ये VVPATची मतमोजणी

 

Nanded VVPAT : नांदेडमध्ये निवडणुकीनंतर केल्या जाणाऱ्या व्हीव्हीपॅट च्या मतमोजणीत एकही मताचा फरक पडलेला नाही. प्रत्येक निवडणूकीनंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदार संघासाठी एकूण 5 मतदान केंद्रातील व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते.  त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 9 विधानासभा मतदार संघातील 45 मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅट आणि लोकसभा पोट निवडणूकीतील 6 मतदार संघातील 30 मतदान केंद्रावर अशा एकूण 75 मतदान केंद्रावरील व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात आली. यात एकाही मतदान केंद्रावरील मतामध्ये फरक पडलेला नाही.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Dec 2024, 10:25 वाजता

विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळणार?

 

Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लागलंय.. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारं संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नाहीये.. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यावं याचा निर्णय सरकार आणि विधानसभा अध्यक्ष घेणार आहे..  विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के आमदारांची गरज आहे.. मात्र कोणत्याही विरोधी पक्षाकडे 10 टक्के आमदार नाहीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Dec 2024, 09:42 वाजता

उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

 

Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केलीय. रविवारी मातोश्रीवर घाटकोपरच्या काही मनसैनिकांनी शिवसेना UBTत प्रवेश केला त्यावेळी बोलताना तुम्बी मरमर मेहनत करता पण त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही, कारण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. पण हे काहीच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे पक्षावर, राज ठाकरेंवर टीका केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Dec 2024, 09:16 वाजता

जळगावात 11 ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू

 

Jalgaon Cotton : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीची दखल घेतली असून रक्षा खडसे यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यात 11 ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर हमी दराने कापूस खरेदी केला जाणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Dec 2024, 08:17 वाजता

विधानसभा अध्यक्षांची आज अधिकृत होणार घोषणा

 

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षपदाची आज अधिकृत घोषणा होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ महायुतीच्या राहुल नार्वेकर यांचाच अर्ज दाखल झाला. त्यामुळे राहुल नार्वेकरच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवडले जाणार आहेत.  आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

9 Dec 2024, 07:54 वाजता

विधानसभेत आज उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी

 

Vidhansabha Special Adhiveshan : विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसांच्या या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली तर दुस-या दिवशी 106 आमदारांचा शपथविधी पार पडला.आतापर्यंत एकूण 279 आमदारांनी शपथ घेतलीय. मात्र अद्याप आठ आमदारांची शपथ बाकी आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शपथविधी होऊ शकलेला नाही. आज या उरलेल्या आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या आठ आमदारांमध्ये उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर,विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके यांची शपथ बाकी आहे. काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालना शपथ घेणार असल्याची माहिती आहे