13 Dec 2024, 08:33 वाजता
दिल्लीतील 4 शाळांमध्ये बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
Delhi School Threat : दिल्लीतील 4 शाळांमध्ये बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल, केंब्रिज स्कूलसह आणखी एका शाळेला धमकीचा मेल आलाय. धमकीचा मेल येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय. पोलीस घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मात्र, संशयित काहीही आढळून आलं नसल्याची माहिती मिळतेय. आज आणि उद्या पालकांच्या बैठकीला लक्ष्य करण्यात येणार असल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आलाय.
13 Dec 2024, 08:13 वाजता
मुंबईत आजपासून वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम
World Hindu Economic Forum : आजपासून मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम 2024चं आयोजन करण्यात आलंय.. 15 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या परीषदेचं उद्घाटन करण्यात येणार असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या परिषदेत संबोधित करतील.. तर उद्या योगी आदित्यनाथ, भूपेंद्र पटेल, पीयूष गोयल हे या परिषदेला उपस्थीत राहतील..
13 Dec 2024, 08:11 वाजता
येरवडा जेलमधून कैदी फरार
Pune : पुण्यातील येरवडा जेलमधून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झालाय. अनिल मेघदास पटोनिया असं कैद्याचं नाव आहे. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र कैद्याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याला खुल्या कारागृहात करण्यात आली होती. याचाच फायदा घेत अनिल पटोनिया हा कैदी जेलमधून पळाला.
13 Dec 2024, 08:09 वाजता
मराठा समाजाकडून बीड बंदची हाक
Beed Close : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मराठा समाजाच्या वतीनं बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येनंतर बीड जिल्ह्याचं वातावरण चांगलंच तापलंय. अगोदरही केज आणि मसाजोग या ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणाची चौकशी करून सर्व आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलं. तर 4 जण फरार आहेत.
13 Dec 2024, 08:08 वाजता
राज्यात थंडीचा कडाका कमी होणार
Maharashtra Temprature : राज्यात थंडीचा कडाका कमी होणार आहे... बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय.. त्यामुळे रविवारपासून पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.. या ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -