13 Dec 2024, 22:18 वाजता
15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
Western Railway : रविवारी 15 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे... पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगावदरम्यान 5 तासांचा जम्बोब्लॉक असणार आहे...या दरम्यान स्लो ट्रॅकवरच्या ट्रेन बंद असतील...तर फास्ट ट्रॅकवरूनच स्लो गाड्या धावतील....बोरिवली आणि गोरेगावदरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे...ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Dec 2024, 21:58 वाजता
सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Dhanajay Nikam : सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय..2 दिवसांपूर्वी सातारा आणि पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता....सातारा जिल्हा न्यायालयात निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता..तो आज फेटाळण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Dec 2024, 18:26 वाजता
महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार?
Maharashtra Politics : महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार?...झी 24 तासला महायुतीच्या सूत्रांची माहिती...भाजपचं त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार?...शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरण्याची शक्यता..राष्ट्रवादीही पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार?
13 Dec 2024, 18:04 वाजता
नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला- सूत्र
Maharashtra Politics : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळतेय.
13 Dec 2024, 17:49 वाजता
अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर
Actor Allu Arjun Granted Bail : अभिनेता अल्लू अर्जुन याला तेलंगणा हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्याआधी अभिनेता अल्लू अर्जुन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला सकाळी अटक केली. त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याविरोधात हैदराबाद हायकोर्टात दाद मागण्यात आली. तिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
13 Dec 2024, 17:09 वाजता
अश्विनी भिडेंची CMOत प्रधान सचिवपदी नियुक्ती
Ashwini Bhide : मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात झाल्याचं यातून दिसून येतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Dec 2024, 16:26 वाजता
अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवस न्यायालयीन कोठडी
Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Dec 2024, 16:11 वाजता
15 डिसेंबरला नागपुरात शपथविधीची शक्यता?
Mahayuti : महायुतीचा शपथविधी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. आमदारांच्या सोईसाठी नागपुरात 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 16 तारखेपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे 15 डिसेंबरला नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
13 Dec 2024, 15:53 वाजता
'बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या', खासदार प्रियंका गांधींची मागणी
Priyanka Gandhi : प्रियंका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण...महिल्याच भाषणात केंद्र सरकारवर हल्लाबोल...देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या-प्रियंका गांधी...पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींची मागणी...भारतीय संविधान नागरिकांसाठी सुरक्षा कवच-प्रियंका गांधी
13 Dec 2024, 15:13 वाजता
'EVM असेपर्यंत निवडणूक लढणार नाही', आमदार उत्तम जानकरांची घोषणा
Uttam Jankar on EVM : EVM विरोधात उत्तम जानकर आक्रमक... EVM असेपर्यंत निवडणूक लढणार नाही आणि मतदानही करणार नाही - उत्तम जानकर...निवडणूक न लढण्याची आमदार उत्तम जानकरांची मोठी घोषणा
बातमीचा व्हिडीओ पाहा-