Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Dec 2024, 18:59 वाजता

दारू परवान्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

 

Liquor License Contro : राज्यात फडणवीस सरकार येताच उत्पन्नवाढीचे मार्ग वाढवण्यासाठी चाचपणी सुरु करण्यात आलीये.. महसूल वाढीसाठी मद्यधोरणात सरकारनं बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरु केलीय आणि सरकारच्या या आयडीयावर विरोधकांनी निशाणा साधत जोरदार टीका केलीय.. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत..

 

25 Dec 2024, 18:14 वाजता

दिल्ली संसदेजवळ एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

 

Delhi Sansad Attempted self-immolation : दिल्लीतील संसदेजवळ एका व्यक्तीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.. अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.. यामध्ये सदर व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहे.. मात्र, आत्मदहन करणा-या व्यक्तीकडे दोन पानांचं एक पत्रही सापडल्याची माहिती आहे., घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झालीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

25 Dec 2024, 17:53 वाजता

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा 1500 रुपये हप्ता मिळण्यास सुरुवात

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme : नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहेत. तसा मेसेजही बँकेकडून त्यांना पाठवण्यात आलाय. विधानसभा निवडणूक निकालानंतर महिलांना डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता मिळाला आहे. तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता महिलांना आधीच दिला गेला होता. 

 

25 Dec 2024, 16:11 वाजता

बीडमध्ये 28 तारखेला मोर्चा निघणारेय- मनोज जरांगे

 

Manoj Jarange on Morcha : बीड, परभणी घटनेवरून मनोज जरांगे आक्रमक झालेत. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी भेट घेतलीय. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेक-यांना सोडू नका, अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलीय. संतोष देशमुखांच्या हत्येवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. बीडमध्ये 28 तारखेला मोर्चा निघणारेय. या मोर्चात राजकारण आणू नका, असं आवाहनही जरांगे यांनी केलंय.

25 Dec 2024, 14:20 वाजता

बीडमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती गंभीर- संजय राऊत

 

Sanjay Raut : बीडमधील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती गंभीर झालीय. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय.... तर बीडमध्ये घडलेल्या घटना गंभीर आहेत मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करु नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालु देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

25 Dec 2024, 13:32 वाजता

मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले- दीपक केसरकर

 

Deepak Kesarkar : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर नाराज नसल्याचा दावा करणा-या दीपक केसरकरांचं एक वक्तव्य चर्चेत आलंय. अनेकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, त्यांची मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय.. माझं मंत्रिपद देव ठरव असतो.. त्यामुळे कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर मी जाईन असं केसरकरांनी म्हटलंय. 

25 Dec 2024, 13:08 वाजता

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं

 

The plane crashed in Kazakhstan : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं...अझरबैजन एअरलाईन्सचं विमान कोसळलं...लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात...विमानात 72 प्रवासी असल्याची माहिती

25 Dec 2024, 12:32 वाजता

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

 

Kalyan : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलंय. विशाल गवळी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला शेगावातून ताब्यात घेतलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

25 Dec 2024, 12:08 वाजता

संभाजीनगरमधील कंत्राटी लिपिक हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार

 

Sambhajinagar Sports Complex Scam Case : संभाजीनगरमधील क्रीडा संकुलाचे 21 कोटी लाटणारा कंत्राटी लिपीक अजूनही पोलिसांना सापडत नाही. कंत्राटी लिपीक हर्षकुमार क्षीरसागर याने संभाजीनगरमध्ये 5 फ्लॅट खरेदी केल्याचं उघड झालंय. 1 आलिशान 4 BHK फ्लॅट आणि बीड बायपास भागातील चार 2 BHK फ्लॅट पोलिसांनी सील केलेत. धक्कादायक म्हणजे हर्षकुमारचे वडील सुतारकाम करतात. तर आई खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करते. फरार आरोपीच्या डोक्यावर बड्या अधिकाऱ्याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. तो आलिशान गाडीमध्ये अधिकाऱ्यांना ने-आण करत होता. पुण्यातील मोठे क्रीडा अधिकारी त्याचा पाहुणचार घेत होते. क्रीडा उपसंचालकांनीदेखील अनेकवेळा त्याच्या गाडीतून प्रवास केल्याची माहिती आहे. अधिकारी स्वतः शहरात न येता हर्षला महत्त्वाच्या फाइल घेऊन मुंबई पुण्याला बोलावत होते असंही तपासात पुढं आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

25 Dec 2024, 11:26 वाजता

बेळगावमध्ये उद्या काँग्रेस कार्यकरिणीची बैठक

 

Congress : बेळगावमध्ये उद्या काँग्रेसचं शंभरावं अधिवेशन भरणारेय. यावेळी कार्यकारिणी बैठक होणारेय. या बैठकीला नवसत्याग्रह असं नाव देण्यात आलंय. महात्मा गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्या घटनेला शंभर वर्षे झाल्यानिमित्त ही सभा होत आहे. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ऐतिसाहसिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. बैठकीत कार्यकारिणी सदस्य, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सहभागी होणारेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 डिसेंबरला 'जय बापू, जय भीम, जय संविधान' ही जाहीर सभा घेतली जाणारेय.