Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Dec 2024, 13:08 वाजता

कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं

 

The plane crashed in Kazakhstan : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं...अझरबैजन एअरलाईन्सचं विमान कोसळलं...लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात...विमानात 72 प्रवासी असल्याची माहिती

25 Dec 2024, 12:32 वाजता

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

 

Kalyan : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतलंय. विशाल गवळी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला शेगावातून ताब्यात घेतलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

25 Dec 2024, 12:08 वाजता

संभाजीनगरमधील कंत्राटी लिपिक हर्षकुमार क्षीरसागर अजूनही फरार

 

Sambhajinagar Sports Complex Scam Case : संभाजीनगरमधील क्रीडा संकुलाचे 21 कोटी लाटणारा कंत्राटी लिपीक अजूनही पोलिसांना सापडत नाही. कंत्राटी लिपीक हर्षकुमार क्षीरसागर याने संभाजीनगरमध्ये 5 फ्लॅट खरेदी केल्याचं उघड झालंय. 1 आलिशान 4 BHK फ्लॅट आणि बीड बायपास भागातील चार 2 BHK फ्लॅट पोलिसांनी सील केलेत. धक्कादायक म्हणजे हर्षकुमारचे वडील सुतारकाम करतात. तर आई खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करते. फरार आरोपीच्या डोक्यावर बड्या अधिकाऱ्याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. तो आलिशान गाडीमध्ये अधिकाऱ्यांना ने-आण करत होता. पुण्यातील मोठे क्रीडा अधिकारी त्याचा पाहुणचार घेत होते. क्रीडा उपसंचालकांनीदेखील अनेकवेळा त्याच्या गाडीतून प्रवास केल्याची माहिती आहे. अधिकारी स्वतः शहरात न येता हर्षला महत्त्वाच्या फाइल घेऊन मुंबई पुण्याला बोलावत होते असंही तपासात पुढं आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

25 Dec 2024, 11:26 वाजता

बेळगावमध्ये उद्या काँग्रेस कार्यकरिणीची बैठक

 

Congress : बेळगावमध्ये उद्या काँग्रेसचं शंभरावं अधिवेशन भरणारेय. यावेळी कार्यकारिणी बैठक होणारेय. या बैठकीला नवसत्याग्रह असं नाव देण्यात आलंय. महात्मा गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली त्या घटनेला शंभर वर्षे झाल्यानिमित्त ही सभा होत आहे. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ऐतिसाहसिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. बैठकीत कार्यकारिणी सदस्य, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सहभागी होणारेत. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 डिसेंबरला 'जय बापू, जय भीम, जय संविधान' ही जाहीर सभा घेतली जाणारेय.

25 Dec 2024, 11:02 वाजता

देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद

 

CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी १२ वाजता त्यांची पत्रकार परिषद असणारेय. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार

25 Dec 2024, 10:19 वाजता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

 

DCM Eknath Shinde Tomorrow Delhi Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर.. पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डांची भेट घेणार...पदभार स्वीकारल्यानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

25 Dec 2024, 09:41 वाजता

नाताळ सुट्टीमुळे तुळजाभवानीचं मंदिर 22 तास सुरू राहणार

 

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीचं मंदिर 22 तास सुरू राहणार...नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानचा निर्णय..आजपासून 1 जानेवारीपर्यंत मंदिर 22 तास सुरू राहणार.. पहाटे 1 वाजल्यापासून रात्री 10.30पर्यंत मंदिर सुरू

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

25 Dec 2024, 09:08 वाजता

मनोज जरांगे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

 

Manoj Jarange : जरांगेंच्या गाठी-भेटी दौ-याचा आज दुसरा दिवस...जरांगे आज परभणी आणि मस्साजोगच्या दौ-यावर...जरांगे संतोष देशमुखच्या कुटुंबीयांची भेट घेणार...जरांगेंचा गाठी-भेटी दौरा आज संपणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

 

25 Dec 2024, 08:28 वाजता

ठाण्यात 2 दिवस पाणीपुरवठा बंद

 

Water supply stopped in Thane for two days : ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणारय. 26 आणि 27 डिसेंबरला 24 तास पाणीपुरवठा बंद असेल. कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद असेल.

25 Dec 2024, 08:02 वाजता

पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणी डम्पर मालकाला अटक

 

Pune Accident : पुण्यातील वाघोली अपघात प्रकरणात डम्पर मालकाला पोलिसांनी अटक केलीय....डम्पर चालक मद्यप्राशन करत असल्याची माहिती असूनही डम्पर चालवायला दिल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली....डम्पर मालक अनिल काटेला अटक करण्यात आलीय...डंपर चालक गजानन तोटरेला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली....