Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Dec 2024, 15:27 वाजता

नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही- अतुल लोंढे

 

Atul Londhe on Nitesh Rane : नितेश राणेंवर काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी टीका केलीय.. काँग्रेसच्या बाजूनं मतदान करणा-यांना नितेश राणे दहशतवादी म्हणात असा पलटवार लोंढेंनी केलाय.. नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याचं लोंढे म्हणालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Dec 2024, 13:01 वाजता

वर्ध्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

 

Wardha Dog Attack : वर्ध्याच्या देवळी गावात पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातलाय.. या कुत्र्यानं 17 मजुरांसह अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. कुत्र्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकावर ग्रामीण जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही हा कुत्रा मोकाट असल्यानं लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.. 

30 Dec 2024, 12:45 वाजता

अंजली दमानियांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

 

Beed Anjali Damania : अंजली दमानियाच्या धरणं आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानिया यांचं आंदोलन सुरू आहे.. . जोपर्यंत वाल्मीक कराडला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा त्यांनी दिलाय.. धनंजय मुंडे यांचा राजीनामाही तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्या यावेळी म्हणाल्यात..जिल्ह्यात शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचे फोटोज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवले असून या अनुषंगाने पुढील तीस दिवसात कारवाई करू असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं दमानिया यांनी सांगितले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Dec 2024, 12:18 वाजता

कंत्राटी बेस्ट बसच्या वेगावर लवकरच नियंत्रण

 

Mumbai Best Bus Speed : मुंबईच्या कंत्राटी बेस्ट बेसच्या वेगावर लवकरच नियंत्रण येणारेय. बसची ताशी 50 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आलीये. तसंच वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदारांना बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचनाही दिल्या जाणारे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्ट उपक्रमाकडून अपघात रोखण्यासाठी विविध उपाय सुचविले जातायेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Dec 2024, 12:16 वाजता

नागपुरात मामानेच केली दोन भाच्यांची हत्या

 

Nagpur Crime : परस्पर वादातून मामानेच दोन भाच्यांचा खून केलाय. गांधीबाग परिसरातील काली माता मंदिरासमोर ही घटना घडली. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या झाली. रवी राठोड आणि दीपक राठोड या दोघं सख्ख्या भावांचं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मामासोबत वाद सुरु होता..  या वादातून आरोपनं दोघांवर चाकूनं हल्ला केला... दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.. 

30 Dec 2024, 12:01 वाजता

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान - नितेश राणे

 

Nitesh Rane On Rahul Gandhi : मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे. दहशतवादीच राहुल  गांधी यांना मतदान करतात, असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलंय. पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय. 

30 Dec 2024, 11:46 वाजता

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार

 

Nashik : नाशिकच्या वणीतील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणारेय. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. वर्षाखेर भाविकांना रात्रभर देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणारेय. नेमका याच दिवशी मंगळवार असल्यानं अधिक गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याठिकाणी अधिक दक्षता घेण्यात आलीये. यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ताही पूर्णपणे खुला ठेवण्यात येणारेय.

30 Dec 2024, 10:19 वाजता

अंजली दमानियांच्या धरणं आंदोलनाचा दुसरा दिवस

 

Beed Anjali Damania : अंजली दमानियाच्या धरणं आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दमानिया यांचं आंदोलन सुरू आहे.. . जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय...  तर दुसरीकडे सीआयडीला तपासात दोन मोबाईल सापडल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिलीय.. एका बड्या नेत्याचा फोनही आल्याचा दावा त्यांनी केलाय.. 

30 Dec 2024, 10:11 वाजता

पुण्यात थर्टीफस्ट पार्टीसाठी पहाटे 5पर्यंत परवानगी

 

Pune 31st December Party : थर्टीफस्टच्या पार्टीसाठी पुण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बार सुरू राहणारेत. मात्र एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय मद्यविक्रीचीही दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणारेय. दरम्यान अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात 21 पथकं सज्ज झालीयेत. जिल्ह्याच्या सीमेवर विशेष पथकं तैनात करण्यात आलीये. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झालेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Dec 2024, 09:35 वाजता

अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान

 

Unseasonal Rain Impact : राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय... जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे दोन हजार सहाशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय.. या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता पुणे कृषी विभागाने व्यक्त केली आहे....अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेर या केळींच्या बागा असलेल्या भागाला बसला. वादळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ झालीये. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.