30 Dec 2024, 09:13 वाजता
जळगाव MIDCमध्ये चटई बनवणाऱ्या कंपनीत आग
Jalgaon Fire : जळगाव शहरातील MIDCमध्ये भीषण आग लागली.. प्लास्टिक पासून चटई बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही आग लागली.. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक असल्यामुळे आग वेगानं परसली.. सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीमध्ये ही आग लागली.. रात्री 12च्या सुमारास सुरक्षारक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली आणि काही क्षणात आगीनं संपूर्ण कंपनीला विळख्यात घेतलं.. या आगीदरम्यान स्फोट झाल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
30 Dec 2024, 09:01 वाजता
सारंगखेडा घोडे बजाराने मोडला 4 वर्षांचा विक्रम
Nandurbar Horse Trade : सारंगखेडा घोडेबाजारानं यंदा गेल्या 4 वर्षांचा विक्रम मोडलाय.. या वर्षी घोडे बाजारात विक्रीसाठी २२०० घोडे दाखल झाले होते. त्यापैकी ९०० घोड्यांची विक्री झाली आहे यातून ४ कोटीची उलाढाल झाली आहे. अजून तीन ते चार दिवस घोडे बाजार सुरु राहणार असल्याने, हा आकडा ५ कोटी पर्यंत पोहचण्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
30 Dec 2024, 08:55 वाजता
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा
Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे लवकरच अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन मिळणारये. अंगणवाडी सेविकांना वेळेत मानधन देता यावं, यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्य़ात आलं होतं. या बैठकीत मानधनाची रक्कम केंद्रीय साहाय्यांकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास आता अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
30 Dec 2024, 08:16 वाजता
प्रवीण दरेकरांचा अंजली दमानियांना टोला
Pravin Darekar On Anjali Damania : अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती असेल त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी उगाच हवेत बोलू नये असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकरांनी लगावलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आशी माहितीही त्यांनी यावेळी दिली..
30 Dec 2024, 08:04 वाजता
कल्याणमध्ये कुटुंबावर जीवघेणा हल्ला
Kalyan Attack : कल्याणच्या चिकणघरमध्ये एका कुटुंबावर त्यांच्याच शेजा-यानं जीवघेणा हल्ला केलाय.. क्षुल्लक करारणावरुन त्यानं हा हल्ला केलाय.. आरोपीनं आधी रॉकेल टाकून या कुटुंबाचं घर जाळण्याचा प्रयत्न केला.. त्यानंतर चौघांवर कु-हडीनं वार केले..यात चौघे गंभीर जखमी असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.. रात्री हे चौघे घराबाहेर गप्पा मारत होते.. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला.. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीये. तर जखमींना रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून यातील दोघांना सायन रुग्णालयात पाठवण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -