Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 30 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Dec 2024, 22:36 वाजता

कल्याणमध्ये अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार

 

Kalyan Crime : कल्याणच्या आंबिवली परिसरात अघोरी विद्येच्या नावाखाली भोंदू बाबाने मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय..भोंदू बाबा अरविंद जाधव याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय...

30 Dec 2024, 21:57 वाजता

'महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार',नितेश राणेंचं विधान

 

Nitesh Rane : 'महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार'...नितेश राणेंचं विधान... 'मुख्यमंत्र्यांनी गोहत्या बंदी कायदा कडक करावा'...मंत्री नितेश राणेंची मागणी...मी आमदार, मंत्री नंतर आधी हिंदू आहे...नितेश राणेंचं विधान

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Dec 2024, 20:22 वाजता

पुण्यात रेल्वे उडवून देण्याचा कट

 

Pune : पुण्यात रेल्वे उडवून देण्याचा कट रचन्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आलाय..मात्र, लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.. रविवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आलाय.. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय.

30 Dec 2024, 19:08 वाजता

बीड शस्त्र परवानाप्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

 

Navneet Kanwat on Beed : बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर....गरज नसतील त्यांचे शस्त्र परवाने रद्द होणार...शस्त्रपरवान्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु...मराठवाड्यात सर्वात जास्त बीडमध्ये शस्त्रपरवाने...परवानाधारक शस्त्रांचा वापर दहशतीसाठी होत असल्याचा आरोप

30 Dec 2024, 18:34 वाजता

आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद- सुरेश धस

 

Suresh Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मीक कराडसह धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय... पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीनं सुरु ठेवण्याची मागणी सुरेश धसांनी केलीये.. संतोष देशमुख हत्येप्रकरणात आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद सुरु असल्याचा दावा धसांनी केलाय.. तर या हत्येप्रकरणात आकाचा आका नसावा, असा सुद्धा संशय त्यांनी व्यक्त केलाय.. 

30 Dec 2024, 18:16 वाजता

वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीची चौकशी सुरू- धनंजय देशमुख

 

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग...धनंजय देशमुखांनी घेतली सीआयडी अधिका-यांची भेट... वाल्मिक कराडच्या दुस-या पत्नीची चौकशी सुरू...धनंजय देशमुख यांची माहिती... ज्योती जाधव यांची चौकशी सुरू असल्याची माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Dec 2024, 17:35 वाजता

थर्टी फर्स्टनिमित्त मुंबई समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यासाठी जादा बसेस सोडणार

 

Mumbai BEST Bus : नववर्ष स्वागतासाठी बेस्टच्या २५ अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहे...मुंबईतील समुद्रकिना-यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे...31 डिसेंबरला बेस्टकडून २५ अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Dec 2024, 17:21 वाजता

नागपुरात 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त

 

Nagpur Drugs Seized : नागपुरात 50लाखांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केलीये.. या प्रकरणी पोलिसांनी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक केलीये.. त्यांच्याकडून 550 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलंय... नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Dec 2024, 16:34 वाजता

31 डिसेंबरला सप्तश्रृंगीचं मंदिर रात्रभर खुलं राहणार

 

Vani Saptashrungi Devi Temple : नाशिकच्या वणीतील सप्तश्रृंगी देवीचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणारेय. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. वर्षाखेर भाविकांना रात्रभर देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणारेय. नेमका याच दिवशी मंगळवार असल्यानं अधिक गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे याठिकाणी अधिक दक्षता घेण्यात आलीये. यासाठी 5 जानेवारीपर्यंत घाट रस्ताही पूर्णपणे खुला ठेवण्यात येणारेय.

30 Dec 2024, 16:03 वाजता

पुण्यात थर्टीफर्स्ट पार्टीसाठी पहाटे 5पर्यंत परवानगी

 

Pune : थर्टीफस्टच्या पार्टीसाठी पुण्यात पहाटे पाच वाजेपर्यंत पब आणि बार सुरू राहणारेत. मात्र एक दिवसाचा परवाना घेऊन पार्टी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. याशिवाय मद्यविक्रीचीही दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणारेय. दरम्यान अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात 21 पथकं सज्ज झालीयेत. जिल्ह्याच्या सीमेवर विशेष पथकं तैनात करण्यात आलीये. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झालेत.