Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Jan 2025, 22:02 वाजता

कराडची चौकशी ऑन कॅमेराच झाली पाहिजे- अंजली दमानिया

 

Anjali Damania on Walmik Karad : वाल्मिक कराड याची सगळी चौकशी ही कुठल्याही परिस्थितीत ‘On Camera’ झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे...त्याच्या खोलीत देखील CCTV असला पाहिजे...कारण खूप खोटं बोललं जात आहे. पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग आले हे कुणालाच पटणारं नाही 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Jan 2025, 20:26 वाजता

SITअहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईल- विखे पाटील

 

Radhakrishna Vikhe Patil on Dhananjay Munde : 'SITअहवालानंतर मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल'...जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती... बीड प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी...अहवालानंतर राजीनाम्याबद्दल निर्णय होईल-विखे पाटील

2 Jan 2025, 18:12 वाजता

मुख्यमंत्री फडणवीसांची बडेजावपणाला बंदी, दौऱ्यात पोलीस मानवंदनेलाही मनाई

 

Devendra Fadnavis : प्रशासनची सूत्रं हाती घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बडेजावपणाला बंदी...आपल्या दौ-यात यापुढे स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणायचे नाही...तसंच दौ-‍याच्या वेळी पोलीस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा आपल्या दौ-‍यात बंद ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Jan 2025, 17:33 वाजता

MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर

 

MPSC Exam : एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर...पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध...महाराष्ट्र गट ब ची परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार...महाराष्ट्र गट क ची परीक्षा 4 मे ला होणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Jan 2025, 16:48 वाजता

संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित

 

Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपी फरार घोषित...स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धी पत्र जारी..पकडून देणाऱ्याला दिलं जाणार योग्य बक्षीस..सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वांटेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर... या आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिले जाईल व नाव गोपनीय ठेवले जाईल.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Jan 2025, 16:04 वाजता

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार?- विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojan : महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत, त्यामुळे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. त्यावर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी प्रत्यूत्तर दिलंय.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

2 Jan 2025, 15:31 वाजता

'लाडकी बहीण लाभार्थींची छननी होणार', मंत्री आदिती तटकरेंची माहिती

 

Ladki Bahin Yojana : निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे.. अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेनी दिलीये..लाडकी बहीण योजनेच्या मूळ निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय...
 

2 Jan 2025, 14:05 वाजता

चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री?

 

Nagpur Nitin Gadkari : पालकमंत्रिपदाबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी अनावधानाने बावनकुळेंचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला मात्र लगेच त्यांनी पालकमंत्री म्हणून अद्याप घोषणा झाली नाही, हे स्पष्ट केलं तसंच पालकमंत्री बावनकुळेच होणार, असंही गडकरींनी सांगितलं. काही ठिकाणी पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेच होतेय. त्यात नागपूरच्या पालकमंत्रिपदाविषयी खुद्द गडकरींनीच माहिती दिलीय.

2 Jan 2025, 12:59 वाजता

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या भिंतीला भगदाड

 

Dadar Shivaji Park : शिवाजी पार्क मैदानातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठं भगदाड पडल्याचं समोर आलंय.या शिल्पाच्या तळाकडच्या भिंतीच्या लाद्या उखडल्यात.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jan 2025, 12:12 वाजता

हत्याकांडाचा खटला बीडबाहेर चालवा - संजय राऊत

 

Mumbai Sanjay Raut : बीड, परभणी मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे असं म्हणत हा खटला  बीड बाहेर चालवावा अशी मागणी राऊतांनी केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा -