2 Jan 2025, 11:53 वाजता
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
Vijay Wadettiwar On Walmik Karad : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. मोठ्या आकांना वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आहे. मात्र पुरावे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जातेय. काहीही होऊ शकतं, याची माहिती आपल्याला उच्चपदस्थांनी दिलीय, असंही वडेट्टीवारांनी सांगितलं...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 11:45 वाजता
रुग्णालयात उंदारांचा धुमाकूळ
Bhandara Rat : सर्वसामान्य जनतेला उपचार आणि आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्र असलेल्या मुख्यालयातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या उंदरांचा कहर सुरू आहे.जिल्हा रूग्णालयातील रूग्ण कक्षात उपचारासाठी भरती असलेल्या रूग्णांच्या अंगावरून अक्षरशः आठ ते दहाच्या संख्येत असलेल्या उंदराची टोळी धुमाकूळ घालत आहे.त्यांच्या डब्यातील व पिशव्यातील खाद्यपदार्थांचा उंदीर फडसा पाडतानांचा विडीओ व्हायरल झालाय.. रुग्णांच्या आरोग्याची खेळ सूर असल्याचं समोर आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 11:21 वाजता
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक
Prime Minitster Narendra Modi On Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय.. गडचिरोलीमध्ये केलेल्या कामांवरुन पंतप्रधानांनी फडणवीसांचं कौतुक केलंय... राज्य सरकारकडून दुर्गम भागात सुरु असलेल्या विकास कामांची त्यांनी प्रशंसा केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 11:17 वाजता
चंद्रपुरात भरधाव ट्रकनं आजी-आजोबा आणि नातवाला चिरडलं
Chandrapur Accident : चंद्रपुरात एका भरधाव ट्रकनं आजी-आजोबा आणि नातवाला चिरडलंय.. भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेवर ही दुर्घटना घडलीये.. हॉटेलमधून जेवण आटोपून हे तिघे मोटारसायकलनं घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली.. हे तिघेही वणी तालुक्यातील रासाघोणसा गावातील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलंय. दरम्यान या दुर्घटनेनंतर भद्रावती शहरात हळहळ व्यक्त केली जातीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 11:06 वाजता
सुदर्शन घुलेच्या तपासासाठी 7 पथकं रवाना
Sudarshan Ghule : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत.. या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे.. तसेच एका गुन्हा संदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे.. त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का या संदर्भात सीआयडीला संशय आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहे... फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास आवळला आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 10:42 वाजता
आठवडाभरानंतर निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट
Niphad Cold : आठवडाभरानंतर नाशिकच्या निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट आलीये. निफाडचा पारा 11 अंशावर गेलाय.. तापमानात होत असलेल्या या चढ उताराचा फटका इथल्या द्रक्षबागांना बसू लागलाय. रात्रीच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागलेत.. तसंच दिवसा पडणा-या कडक उन्हामुळे द्राक्षमणी बर्न होण्याची भीती निर्माण झालीये.. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 10:18 वाजता
RTE प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ
RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ देण्यात आलीये.. 18 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत RTE प्रक्रियेच्या शाळानोंदणीची मुदत दिली होती.. मात्र अपेक्षित नोंदणी न झाल्यानं ही मुदत आता 4 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलीये. त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रीया पूर्ण करता येणार आहे... त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु होईल.. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं हा निर्णय घेतलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 09:54 वाजता
रात्री 1 पासून तुळजाभवानीचं दर्शन
Tuljapur : तुळजाभवानीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी... मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे आठवड्यातील तीन दिवस तसंच पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीचं मंदिर मध्यरात्री 1 वाजता खुलं होणार आहे.. दर्शनासाठी वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय.. वर्षभर हा नवा बदल लागू असणार आहे.. मंदिर संस्थानाकडून याबाबत पत्रकही काढण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 09:21 वाजता
जळगावच्या पाळधी गावात संचारबंदी वाढवली
Jalgaon Cerfew : जळगावच्या पाळधीमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दोन गटात झालेल्या राड्या नंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली होती. त्यानुसार ही संचारबंदी आज सकाळी आठ वाजेपर्यंत होती मात्र प्रशासनं ही संचारबंदी पुन्हा वाढवली असून आज रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे असे आदेश काढण्यात आलेत. पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे.
2 Jan 2025, 08:35 वाजता
वसई-विरारकडे भाजपचं लक्ष
BJP Focus On Vasai-Virar : विधानसभेतील जोरदार विजयानंतर आता भाजपनं वसई-विराकडेही आपलं लक्ष केंद्रित केलंय.. वसईतील बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं बविआचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. यात 50हून अधिक माजी नगरसेवकांचाही समावेस आहे.. हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..