2 Jan 2025, 08:17 वाजता
अमेरिका दहशतवादी हल्ल्यानं हादरली
USA Terror Attack : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत दहशतवादी हल्ला झालाय.. हल्लेखोराने न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर गर्दीत ट्रक घुसवला त्यानंतर वाहनातून बाहेर पडून गर्दीवर गोळीबार केला.. या हल्ल्यात 15 नागरिकांचा मृत्यू झालाय..या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
2 Jan 2025, 07:44 वाजता
नराधमाला आज कोर्टात हजर करणार
Kalyan Crime : कल्याण कोळशेवाडी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्ये प्रकरणी आज नराधम विशाल गवळीला कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणारेय.. सर्व पुरावे न्यायलयात सादर करणार असल्याची माहिती समोर आलीये. आरोपी विशाल गवळी याला घेऊन कल्याण पोलीस शेगावला रवाना झालेत.. आरोपीने हत्या केल्यानंतर तो नेमका कुठे राहिला होता, त्याला कोणी मदत केली त्या ठिकाणचा पंचनामा आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी विशालला शेगावला घेऊन गेल्याची माहीती मिळालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Jan 2025, 07:39 वाजता
शेतकऱ्यांना DAPखतावर विशेष अनुदान मिळणार
DAP Subsidy : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी.. आजपासून शेतक-यांना DAP खतावर विशेष अनुदान मिळणार आहे.. त्यामुळे शेतक-यांना 50 किलो DAPखताची गोणी 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे.. अनुदानाअभावी हे खत शेतक-यांना तीन ते साडेतीन हजार रुपयांना विकत घ्यावे लागत होते.. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता परवडणा-या दरात हे खत शेतक-यांना मिळणार आहे.. या अनुदानासाठी केंद्र सरकार ३ हजार ८५० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले