7 Jan 2025, 15:04 वाजता
महापालिका निवडणुकीत MNS-BJP युती?
MNS : महापालिका निवडणूकीत मनसे टाळीसाठी हात पुढे करणार?...आगामी महापालिका निवडणूकीकरता मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा...लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकारघंटेनं मनसेची युती होऊ शकली नाही- सूत्रांची माहिती...मात्र; आता महापालिका निवडणूकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार...मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याची राजकिय स्थितीचा आढावा घेणार; त्यावरुन युतीबाबत अंतीम निर्णय होणार...विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेसोबत युती करण्यास तयार असतांना आणि भाजपचाही ग्रीन सिग्नल असतांना शिंदेमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता...मात्र; विधानसभेत मनसे आणि शिंदेंचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहील्यानं जागांवर काही दोघांचे नुकसान झाले... अनेक ठिकाणी याता ठाकरेंना फायदा झाला...त्यामुळे; आतामहापालिका निवडणूकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक आहे...हिंदुत्वाचा मुद्दा; मोदींचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसेनं युती करायची ठरवल्यास ही युती भाजपबरोबर होण्याची शक्यता जास्त...उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेलेत...दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असल्यानं आता भाजपच मनसेसमोरील युतीचा पर्याय असल्याची चर्चा
7 Jan 2025, 13:18 वाजता
सांगलीत बस आणि ट्रकचा अपघात, 19 विद्यार्थी जखमी
Sangli Accdient : सांगलीत बस आणि ट्रकचा अपघात झालाय.. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झालेत त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्व विद्यार्थी कवठेमहांकाळ निवासी शाळेचे विद्यार्थी असून मिरज येथे पार पडत असलेल्या क्रीडा स्पर्धां आटपून एसटी बस मधून पुन्हा कवठेमहांकाळकडे निघाले असता नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील तानंग फाटा येथे वळण घेताना 14 चाकी ट्रक आणि बसचा अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
7 Jan 2025, 13:04 वाजता
वाल्मिक कराडची 4 ते 5 दारुची दुकानं - अंजली दमानिया
Anjali Damania : वाल्मिक कराडची 4 ते 5 दारू दुकाने आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय. या संदर्भात एक पत्र मिळालं आहे आणि त्यातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं दिलीय, अशी माहिती दमानिया यांनी दिलीय. वाल्मिक कराडची केज, वडवनी, बीड आणि परळीत 4 ते 5 दारूची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजार भाव 5 कोटी आहे. सातबारा 15 दिवसानंतर होतो... पण सगळे कायदे कसे धाब्यावर बसवले याचं हे उदाहरण आहे, असं ट्वीट दमानिया यांनी केलीय.
7 Jan 2025, 12:53 वाजता
आता सर्व वाहनांना HSRP नंबरप्लेट बंधनकारक
Washim : वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबरप्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट नसेल त्यांना ३१ मार्च नंतर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तसं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 12:31 वाजता
सरकारनं नैतिकतेनं निर्णय घ्यावा - सुप्रिया सुळे
Supirya Sule : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय. सरकारने संवेदनशीलपणे याचा विचार करावा. अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा नैतिकता पाहुन कांग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता तेव्या आता सरकारने ठरवावं त्यांनी काय करायचं ते अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 11:01 वाजता
पालघरमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
Palghar Health Issue : पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्था कूचकामी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.. त्यातच आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर मधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.. पालघर ग्रामीण रुग्णालयात निकिता डगला यांची प्रसुती झाली. त्यांना दोन जुळी मुलं झाली.. मात्र मुलांचं वजन कमी होतं. त्यामुळे त्यांना पालघरमधून जव्हार इथं शिशू देखभाल कक्षात जाण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे नुकतीच प्रसुती झालेल्या महिलेला 80 किलोमीटरचा प्रवास करून जव्हार इथं जावं लागलंय.. पालघर जिल्हाच्या निर्मितीला 10 वर्ष पूर्ण झालीय.. मात्र अजूनही नागरिकांना आरोग्याच्या पुरेशा सुविधा देण्यास सरकार आणि प्रशासनाला यश आलं नाहीये. त्यामुळे पालघरची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय..
7 Jan 2025, 10:36 वाजता
पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला?
Gurdian Minister : पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीये.. पालकमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. पालकमंत्री म्हणून पूर्वीचे जिल्हेच कायम ठेवावेत, असा आग्रह ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला होता, तो मान्यही झाला आहे. काही ठिकाणी ज्येष्ठत्व तर काही ठिकाणी गेल्या सरकारमधल्या पालकमंत्रिपदाचा अनुभव याचाही विचार केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.. मात्र बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्यापही झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 10:08 वाजता
रायगडमध्ये 73% बलात्कार अल्पवयीन मुलींवर
Raigad : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षात बलात्काराच्या १०७ घटना समोर आल्या. धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील ७४ प्रकरणे ही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची होती. म्हणजेच जिल्ह्यात दाखल होणाऱ्या बलात्कारांच्या गुन्हयात ७३ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी निगडीत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील काही वर्षांपर्यंत रायगड जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे वर्षाला ५० गुन्हे दाखल होत होते. गेल्या तीन वर्षात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. जिल्ह्यात वार्षिक १०० हून अधिक गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. यातही पॉक्सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 09:43 वाजता
13 लाख रुपयांचं अवैध सागवान लाकूड जप्त
Gondia Wood Seized : सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकऱ्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिका-यांनी सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली. शेंडा परिसरातल्या जंगलातून हे सागवान लाकूड अवैधरित्या नेलं जात होतं. वन अधिका-यांनी फुटाळा गावाजवळ वाहनाला थांबवत तपासणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड आढळलं. लाकूड कुठून आणलं, याची कागदपत्रे विचारली असताना चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे हा लाकूड चोरीचा असल्याचं निष्पन्न झालं. वन विभागाने 3 आरोपींसह लाकूड, वाहन जप्त केले. यात आणखी काही आरोपी असून ते फरार आहेत त्यांचा शोध वनविभाग घेतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 09:23 वाजता
मनोज जरांगेंवर बीडमध्ये 8 गुन्हे दाखल
Manoj Jarange : मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य करणं मनोज जरांगेंना महागात पडलंय. जरांगेंविरोधात बीड जिल्ह्यात 8 अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत. परभणीतील आक्रोश मोर्चात जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेत. 24 तासात 8 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. अंबाजोगाई, परळी ग्रामीण, सिरसाळा, केज, धारूर आणि गेवराई येथील पोलिस ठाण्यात जरांगे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -