Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

7 Jan 2025, 22:11 वाजता

वंदेमातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं- रामगिरी महाराज

 

Ramgiri Maharaj : संभाजीनगरमध्ये महंत रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय.. वंदेमातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं. असं विधान त्यांनी केलं होतं.. एका चित्रपटाच्या टीजर लाँच कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.. आपण चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीतासाठी उभे राहतो.. मात्र हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहलं होतं.असं ते म्हणाले.. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मानने योग्य नाही यात बदल व्हायला हवा असं ते म्हणाले. मात्र या वक्तव्यावर त्यांनी नंतर युटर्न घेतला.. दरम्यान मी राष्ट्रगीताचा अपमान केला नाही असं रामगिरी महाराजांचे म्हणणं आहे मी फक्त सत्य सांगितलं आणि सत्य सांगायला घाबरण्याची गरज नाही असं सांगत त्यांनी राष्ट्रगीताबाबत केलेल्या विधानचे समर्थनही केलं 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jan 2025, 21:56 वाजता

अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर- सूत्र

 

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौ-यावर...पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेणार...भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता...सूत्रांची झी २४ तासला माहिती... दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याची शक्यता... दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं 11 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीचं जाहीर केलीये..

7 Jan 2025, 20:17 वाजता

वन नेशन वन इलेक्शनबाबत संसदीय संयुक्त समितीची उद्या बैठक

 

One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनबाबत संसदीय संयुक्त समितीची उद्या बैठक...राजधानी दिल्लीत उद्या समितीची पहिली बैठक होणार...विधेयकाच्या विरोधावर काँग्रेस पक्ष ठाम...राज्यातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळे, अनिल देसाईंचा समितीत समावेश
 

7 Jan 2025, 19:09 वाजता

'देशमुख खून प्रकरण, तपासाचा फोकस हलतोय', सुषमा अंधारेंचा आरोप

 

Sushma Andhare on Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाचा फोकस हलतोय असा आरोप, शिवसेना UBTच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. या प्रकरणातील मारेकरी आणि त्यांचा मास्टरमाईंड यांना फाशी झालीच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी धरले आहेत असा सवाल सुषमा अंधारेंनी केला. तसंच संशयाच्या फे-यात सापडलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन अजित पवार नैतिकता पाळणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर कोणीतरी पोलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करतोय का आणि सुरेश धस सभांमधून बोलत आहेत त्यांचे त्यांनी पुरावे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jan 2025, 18:08 वाजता

सुरेश धस अभ्यास करून बोलणारे नेते- बजरंग सोनवणे

 

Bajrang Sonawane on Walmik Karad : खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केला.. त्याबाबत बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलीय सुरेश धस हे अभ्यास करून बोलणारे नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलतात शासनाने आणि पोलीस यंत्रणेने याचा तपास करायला पाहिजे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

7 Jan 2025, 17:30 वाजता

विशाळगड पर्यटकासाठी खुला होणार, 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला होणार

 

Vishalgad Fort : कोल्हापुरातील विशाळगडावर जाण्यास अखेर पर्यटकांना परवानगी... पर्यटकांना नियम आणि अटी घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी...31 जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार...पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना...विशाळगडावरील हिंसाचाराच्या तब्बल पाच महिन्यानंतर विलशाळगड पर्यटकांसाठी होणार खुला

 

7 Jan 2025, 17:01 वाजता

आसाराम बापूला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर

 

Asaram Bapu Bail : बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या आसाराम बापूला सुप्रीमकोर्टानं दिलासा दिलाय.. 85वर्षीय आसाराम बापूला सुप्रीम कोर्टानं 31 मार्चपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केलाय.. प्रकृतीच्या कारणास्तव कोर्टानं हा जामीन मंजूर केलाय.. मात्र या काळात आसाराम बापूला अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश कोर्टानं दिलेत.. सध्या आसाराम बापूवर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. हृदय विकार असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jan 2025, 16:33 वाजता

दिल्ली विधानसभेची तारीख ठरली, 5 फेब्रुवारीला मतदान 

 

Delhi Elections 2025 Date Announcement : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्यात. 5 फेब्रुवारीला मतदान होणारे तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणारेय. एकाच टप्प्यात निवडणूक होणारे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखाची घोषणा केलीय. नवीन वर्षात दिल्ली विधानसभेच्या पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jan 2025, 16:14 वाजता

बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द 

 

Beed : बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आलेत.. पोलिसांनंतर आता जिल्हा प्रशासन सुद्धा अॅक्शन मोडवर आलंय.. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 281 शस्त्र परवाने दिलेले आहेत.. परवाने देण्यात आलेल्यांपैकी 232 जणांवर 1 ते 16 गुन्हे आहेत. त्यापैकी गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.. तर अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलेल्या कैलास फडचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jan 2025, 15:41 वाजता

1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य

 

Fastag : 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बातमीचा व्हिडीओ पाहा-