7 Jan 2025, 09:01 वाजता
HMPVशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज - मेघना बोर्डिकर
Parbhani Meghana Bordikar On HMPV : HMPVशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहे अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलीये.. भारतात या विषाणूचे 5रुग्ण आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊनये.. काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय...
7 Jan 2025, 08:41 वाजता
तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात
Tuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजता विधिवत पूजा करून घटस्थापनेने या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. पुढील सात दिवस म्हणजे 14 जानेवारी पर्यंत आई तुळजाभवानीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरम्यान आज पहाटे सात दिवसाची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान झाली. मानाच्या पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून देवीच्या मूर्तीची मंदिराला प्रदक्षिणा घालत तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 08:32 वाजता
मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ गोळीबार
Mumbai Firing : मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाबाहेर गोळीबार झालाय.. मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी एका अंगाडिया व्यापा-यावर गोळीबार केला.. अंगडीया मौल्यवान दागिने घेऊन जाताना CSMTच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं सैफ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गोळीबार करणारे पी डिमेलो मार्गावरुन माझगावच्या दिशेनं पळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीये.. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं या आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी MRAपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 08:05 वाजता
मुंबई एअरपोर्टवर 4 कोटींचा गांजा जप्त
Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला.या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या विमानात प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने विमानाच्या बाहेर सापळा रचला होता. या विमानातून उतरणाऱ्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करत त्याच्या सामानाची तपासणी केली. प्लास्टिकच्या हवाबंद बॅगेत गांजा लपवल्याचं आढळलं. हा गांजा कुणासाठी आणला या संदर्भात त्याची चौकशी केली असता त्याने मुंबईतील एका व्यक्तीचं नाव सांगितलं. त्यापार्श्वभूमीवर दोघांना अटक करण्यात आली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 07:56 वाजता
नक्षलवादी हल्ल्यानंतर NIA अॅक्शन मोडवर
NIA On Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडवर आलीय. छत्तीसगडमध्ये काल नक्षलवादी हल्ल्यात 9 जवान शहीद झाले होते. विजापूरच्या अम्बेलीमध्ये मोठा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करणारेय. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
7 Jan 2025, 07:43 वाजता
उत्तर भारत भूकंपानं हादरलाय
Earthquake : उत्तर भारत भूकंपानं हादरलाय.. पश्चिम बंगालसह बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत.. या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमधील गोकर्ण भागात होतं.. या भूकंपाची तिव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आलीये. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी, जलपायगुडीमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -