Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Jan 2025, 15:06 वाजता

फोन केले नाहीत तर ते लोक पार्लेमेंटमध्ये भेटले​- जितेंद्र आव्हाड

 

Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या फोडाफोडीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलीय. फोन केले नाहीत तर ते लोक पार्लेमेंटमध्ये भेटले, या आमच्याकडे. बापाला आणि मुलीला सोडून या....असं म्हणतायत

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

8 Jan 2025, 14:49 वाजता

राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ? 

 

NCP : राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ? सुरू झाल्याची माहिती आहे.. कारण शरद पवारांना सोडण्यासाठी खासदारांना फोन?...'बापलेकीला सोडून अजितदादांकडे या'...राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांच्या खासदारांना फोन आल्याची माहिती...खासदारांना फोन आल्यामुळे सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे..

8 Jan 2025, 13:35 वाजता

भंडा-यातील तुमसरमध्ये वाघिणीची शिकार

 

Bhandara Tiger : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये एका वाघिणीची शिकार करुन तिच्या शरिराचे चार तुकडे करुन जंगलात फेकून देण्यात आलेत.. तुमसरच्या झंडेरिया इथल्या जंगलात ही घटना घडलीये.. याप्रकरणी वनविभाग आणि पोलिसांनी तिघांना अटक केलीये.. वनविभागाच्या पथकाला गस्त घालाना तीन पुलिया तलावाजवळ वाघिणीच्या शरिराचे मान,धडाचे दोन तुकडे,शेपटीचा एक भाग असे अवयव सापडले.. याअगोदर 8 दिवसांपूर्वीच तुमसर वन विभागाच्या लेंडेझरी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर 8 दिवसांतच आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

8 Jan 2025, 13:32 वाजता

तुळजाभवानी गाभाऱ्यातील शिळांना तडे

 

Tuljabhawani Temple : तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये..गाभा-याच्या संवर्धनाच्या वेळी  गाभा-यातील चार शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजी बुवा यांनी निदर्शनास आणून दिली.. तडे गेलेल्या या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगितलंय. 

8 Jan 2025, 13:24 वाजता

दादरमध्ये शिवसेनेत 'सामना'

 

Mumbai Shivsena Vs Shivsena : बातमी मुंबईतून.. मनपा निवडणुकीआधीच दादरमध्ये दोन्ही शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायाला मिळालाय.. दादर फुलमार्केटमधील बॅनरवरुन माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यात वाद झाला...फुल मंडईतील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांनी पालिका अधिका-याला जाब विचारला.. यावर उत्तर देताना आमदार महेश सावंत यांनीही सरवणकरांवर टीकेची झोड उठवली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Jan 2025, 12:37 वाजता

बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराचं थैमान

 

Buldhana Hair Loss : बुलढाण्यात केस गळतीच्या साथीनं थैमान घातलंय. केवळ 3 दिवसांमध्ये एक दोन नव्हे तर 30 जणांना टक्कल पडलंय. शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना या साथीची लागण झालीय. 3 दिवसांत टक्कल पडल्यानं नागरिक घाबरलेत. आरोग्य विभागानं गावागावात जाऊन सर्वेक्षण सुरू केलंय. ही साथ नेमकी कशी पसरलीय, याबाबत माहिती मिळत नाही. त्याचा शोध घेतला जातोय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Jan 2025, 12:35 वाजता

फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये बदल होणार

 

Facebook & Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये लवकरच मोठा बदल होणारेय. कंपनी आपला थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. आता त्याच्या जागी 'कम्युनिटी नोट्स' नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणारेय, मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी ही मोठी घोषणा केलीय. या नियमामुळे विशिष्ट विषयांवरचे निर्बंधही हटवले जाणारेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Jan 2025, 12:33 वाजता

बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

 

Beed Police Suicide :  बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय. आज सकाळी ही घटना उघड झालीय.अनंत मारोती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे..दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हेअद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे..

8 Jan 2025, 11:52 वाजता

नितीन गडकरींकडून नव्या योजनेची घोषणा

 

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका नव्या योजनेची घोषणा केलीय. या योजनेद्वारे रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत.   सात दिवसांपर्यंतच्या किंवा दीड लाखांपर्यंतचा उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचं नितीन गडकरींनी जाहीर केलंय. यासाठी 24 तासांच्या आत अपघाताची नोंद पोलिसांत देणं बंधनकारक असणारेय. तर हिट अँण्ड रन केसप्रकरणी  पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाखापर्यंतची भरपाई जाहीर करण्यात आलीय.केंद्र आणि राज्यशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी ही घोषणा केली

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Jan 2025, 11:22 वाजता

वाळू, राखेची गँग वाल्मिकनं तयार केली - सुरेश धस

 

Suresh Dhas On Walmik Karad : वाल्मिक कराड गंभीर प्रकरण असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. वाल्मिकने वाळू, राखेची गँग  तयार केलीय. या वाल्मिकच्या गँगवर मोक्का लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. इतकंच नाही तर 2 दिवसात कराडचे सर्व पुरावे देणार असल्याचंही धस म्हणालेत. 'धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असं म्हणत त्यांचा राजीनामा हा देवगिरी बंगल्यावरचे मंत्री घेतील असंही ते म्हणाले

बातमीचा व्हिडीओ पाहा -