Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Jan 2025, 22:53 वाजता

आंध्रातील तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू

 

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील विष्णू निवासम इथे चेंगराचेंगरीत चौघांचा मृत्यू झाला. वैकुंठ द्वार दर्शन टोकन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेची माहिती घेऊन, जखमींवर उपचारांबाबत अधिका-यांशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jan 2025, 21:38 वाजता

कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार

 

Prakash Abitkar : आता काचेच्या कपातच चहा मिळणार!...कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार..आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे संकेत...आरोग्याला धोका निर्माण होणा-या वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन..आरोग्य आणि, पर्यावरण विभागामार्फत पेपर, प्लास्टिक कप बंदीबाबत जनजागृती केली जाणार असल्याची प्रकाश आबिटकरांची माहिती 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jan 2025, 20:11 वाजता

बुलढाण्यात विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

 

Buldhana : शासकीय वसतिगृहेदेखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे..बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पेठ येथील शासकीय वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आलाय.. वसतिगृह अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडालीये... याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केल असून त्याच्यावर गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

8 Jan 2025, 19:28 वाजता

परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह

 

Parli : बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याची  जोरदार चर्चा सुरू असताना परळी मधून एक धक्कादायक बातमी पुढं आली आहे...परळी तालुक्यत गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत..या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे, यात आत्महत्या केलेले, बेवारस मृतदेह आढळलेले,अपघातात मृत्यू झालेले  मृतदेह असतात मात्र एक तालुक्यत इतका मोठा आकडा भुवया उंचावणार आहे.. पोलिसांचया माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झाले आहेत..त्यामुळं  हा आलेला आकडा हा पोलीस तपासाचा भाग आहे मात्र फक्त परळी तालुक्यत इतके मृतदेह आढळून येणे धक्कादायक आहे..मागील वर्षभरात  परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाहीय तर   परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले त्यातील 21 मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर 4 मृत देहाची ओळख पटली नाही,  तीनही पोलीस स्टेशनच्या  हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दर 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येताय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

8 Jan 2025, 19:07 वाजता

पुण्यातील IT कंपनीतील तरुणीची हत्या प्रकरण, अद्दल घडवण्यासाठी कृष्णाचा तरुणीवर हल्ला

 

Pune Crime : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे....वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून तरुणीनं विश्वासघात केला होता असा दावा आरोपी कृष्णानं केलाय....आपल्याला तिला मारायचं नव्हतं तर अद्दल घडवायची होती असं कृष्णानं सांगितलंय.... विश्वासघात झाल्याची भावनान मनात ठेवून कृष्णानं तिच्यावर हल्ला केला....वडील आजारी असल्याचं सांगून त्या तरुणीनं वेळोवेळी आपल्याकडे पैसे मागितल्याचं कृष्णानं सांगितलं... प्रत्यक्षात तिच्या वडिलांना कुठलाही आजार नसल्याचं लक्षात आल्यावर कृष्णानं तिला अद्दल घडवायचं ठरवलं... हे दोघेही पुण्यात एकाच आयटी कंपनीमध्ये काम करत होते...वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत तिनं सुमारे 4 लाख रुपये उकळल्याचं कृष्णानं पोलिसांना सांगितलं....कृष्णा जेव्हा तिच्या गावी गेला तिचे वडील ठणठणीत असल्याचं पाहून त्याला मोठा धक्का बसला होता...सत्य समजल्यावर कृष्णाने तिच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. यातून त्यांच्यात अनेक वेळा वादही झाले होते. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jan 2025, 18:15 वाजता

रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण, नाशिक डीआयजींच्या अध्यक्षतेत SITची स्थापना

 

Malegaon : रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण...गृह विभागाने गठित केली SIT...नाशिक डीआयजींच्या अध्यक्षतेत SITची स्थापना...SITमध्ये नाशिक विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक या चार सदस्यांचा समावेश...चौकशी अहवालसह शिफारसी करण्याच्या सूचना 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jan 2025, 17:54 वाजता

पुण्यात शाळेत चेंजिंग रुममध्ये मोबाईलने मुलींचं रेकॉर्डिंग

 

Pune :  पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार उघड झालाय....पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय...शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे उघड झालंय...शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे....शाळेतील किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ तो रेकॉर्ड करत होता....याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

8 Jan 2025, 17:01 वाजता

पुण्यात अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके

 

Pune Dog : अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. पुण्यतील वैकुंठ स्मशानभूमीतली ही घटना आहे. इथल्या गॅसदाहिनीत मृतदेहांची नीट विल्हेवाट लागत नसल्याचं समोर आलंय. सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बारवकर यांनी या संतापजनक घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सादर केले. तसंच या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

8 Jan 2025, 16:28 वाजता

'राष्ट्रवादी SP सत्तेत जाणार असल्याच्या अफवा', शरद पवारांची भूमिका

 

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी मुंबईत पक्षाच्या बैठकीत सांगितलं.... जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढण पसंद करणार असल्याचं ते म्हणाले...आगामी 15 दिवसांत संघटनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.... 1999 साली आपली जी परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे....आता आपल्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नसल्याचं पवारांनी सांगितलं....आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरं जाणार असल्याचं ते म्हणाले. 

 

8 Jan 2025, 16:04 वाजता

अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर नितेश राणे?

 

Nitesh Rane : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर नितेश राणे?...काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न...हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती...व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या नावाचा समावेश...उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही नावाचा यादीत उल्लेख... केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती 

बातमीचा व्हिडीओ पाहा-