8 Jan 2025, 11:07 वाजता
हिंदुत्वासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं - योगेश कदम
Yogesh Kadam On MNS : हिंदुत्त्वासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं.. येणा-या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या सोबत राहावं असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय.. मात्र एकनाथ शिंदे यांना दोष देणार असतील तर आम्ही ऐकणार नाही असं ते म्हणालेत.. मनसेमुळे विधानसभेत आमचे दोन उमेदवार पडल्याचंही ते यावेळी म्हणलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Jan 2025, 11:01 वाजता
वाल्मिक कराडचा आज व्हॉईस सॅम्पल घेणार-सूत्र
Walmik Karad : मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीतील खंडणी प्रकरणी कारवाईला वेग आलाय. या प्रकरमी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचं आज व्हॉईस सॅम्पल घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराचीही आज झडती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. त्यामुळे या प्रकरणात कोणती माहिती समोर येतीये याकडे सा-यांचं लक्ष लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Jan 2025, 10:30 वाजता
मुंबईत आढळला HMPVचा पहिला रुग्ण?
Mumbai HMPV Case : मुंबईत HMPVचा पहिला रुग्ण आढळून आल्याची माहिती सोमोर येतीये.. एका 6 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर येतीये.. या बाळावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. मात्र आरोग्य विभागानं अद्याप याबाब कोणतिही अधिकृत माहिती दिलेली नाहीये..
8 Jan 2025, 10:06 वाजता
अनोळखी व्यक्तीनं तरुणीचे केस कापले
Dadar Hair Cut : मुंबईत एका अनोळखी व्यक्तीनं एका तरुणीचे केस कापलेत.. मुंबईतील दादर या वर्दळीच्या रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडलीये.. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरुन 19 वर्षांची तरुणी जात होती.. त्यावेळी आरोपीनं अचानक तिचे केस कापले.. तिकीट आरक्षण खिडकीजवळून जाताना अचानक तरुणीला काहीतरी टोचल्यासारखे जाणवलं.. मागे वळून पाहीलं असताना एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन पळताना दिसला.. त्याच वेळी कापलेले केसही पडलेले दिसले.. यानंतर या मुलीनं पोलिसांत तक्रार दाखल केली.. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला चेंबूरमधून अटक केली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Jan 2025, 08:58 वाजता
अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर
Arun Gawali : कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आलीय. नागपूर खंडपीठाने संचित रजा याचिकेवर निर्णय देत 28 दिवसांची रजा मंजूर केलीय. अरुण गवळीने संचित रजा मिळवण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षकडे 18 ऑगस्ट 2024 अर्ज केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 2024 ला तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. या विरोधात अरुण गवळीने कोर्टात याचिका केली होतीय. यावर निर्णय देताना कोर्टानं 28 दिवसांची संचित रजा मंजूर केलीय. सध्या अरुण गवळी हा नागपूर कारागृहात आहे... लवकरच तो तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे..
8 Jan 2025, 08:27 वाजता
रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Crime : अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडली. 11 वर्षांची ही पीडित मुलगी घराबाहेर सायकल चालवत असताना तिला आपल्या घरात बोलावून शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीला धमकावून वारंवार असले लज्जास्पद प्रकार केले गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीच्या नातेवाईकांना दमदाटी आणि धमकावल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या दोन भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. पीडीत मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Jan 2025, 08:04 वाजता
राष्ट्रवादी SP पक्षाची 2 दिवस आढावा बैठक
Mumbai NCP SP Meeting : राष्ट्रवादी SP पक्षाची दोन दिवसीय आढावा बैठक आजपासून होतेय. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होणार आहे. मुंबईतील YB सेंटर इथे सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजित करण्यात आलंय.. बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार तसेच जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची पुढची दिशा या बैठकीत ठरवली जाणार.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Jan 2025, 08:02 वाजता
थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठला
State Cold : थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठलाय. राज्यातील अनेक शहरांचं किमान तापमान १३ तर मुंबई महानगराचं तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आलंय शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, शुक्रवारनंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरातील गारठ्यात वाढ झालीय.