Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

3 Jul 2024, 12:34 वाजता

मंत्रिमहोदय, सांगा कसं शिकायचं?

 

State ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय... प्रेक्षकहो, तुमची मुलं चांगल्या शाळेत जात असतील, ते एसीमध्ये शिक्षण घेत असतील. मात्र राज्यातल्या अनेक शाळांमध्ये मुलभूत सोयीसुविधांचाच अभाव आहे. राज्यभरातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गळकं छत, पडक्या भिंती असलेल्या... कुठे फुटक्या फरश्या दिसून येतायत... प्रातिनिधिक स्वरुपात आपण स्क्रीनवर हिंगोली, सातारा, कोल्हापूर, नांदेडमधलं वास्तव पाहतायत... मात्र अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे हाल सुरुयत... मुलभूत सुविधांचाही इथं मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतायत. तेव्हा याकडे मंत्रिमहोदय कधी लक्ष देणार? या मुलांना सोयीसुविधा कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होतोय. 

3 Jul 2024, 12:05 वाजता

मंत्रिमहोदय, सांगा कसं शिकायचं?

 

Nanded ZP School : कधीही कोसळेल असं छत... भेगाळलेल्या, ओल आलेल्या भिंती... फुटलेल्या फरश्या... असं चित्र आहे नांदेडच्या हदगावमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं... नांदेडमधल्या 400 जिल्हा परिषद शाळांची अशी दुरवस्था झालीय. झी २४ तासच्या माध्यमातून आपण हे वास्तव पाहू शकत आहात. हदगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत पावसामुळे वर्ग खोल्यांची गळती होतेय. भिंतींमधून पाणी झिरपत असल्यानं भिंतींच्या खपल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडत आहे. तर अनेक वर्गात वीजपुरवठा नसल्यानं फॅन, लाईट बंद आहेत. शौच्छालय मोडकळीस आल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय. अशा परिस्थितीत गोरगरीब विद्यार्थी नाईलाजानं इथं शिक्षण घेताहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 11:53 वाजता

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

 

Delhi Sanjay Raut : खासदास संजय राऊतांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवलीये.. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बाल बुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा  अपमान असल्याचं राऊत म्हणालेत.. महायुतीमध्ये कोणीही वाघ नाही तर लांडगे आणि कोल्हे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.. 

3 Jul 2024, 10:37 वाजता

नाना पटोले क्रिकेटच्या मैदानात

 

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड झालीय. नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार असतील. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करणारेत. त्यामुळे आता पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक रंगतदार होऊ शकते.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 10:23 वाजता

कोल्हापुरात नरबळीचा प्रकार?

 

Kolhapur : गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कौलव गावातल्या एका घरामध्ये तीन फूट खड्डा खणला असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी राधानगरी पोलिसात जादूटोणा कायदा अंतर्गत 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 09:40 वाजता

दीक्षाभूमीवरील तोडफोड प्रकरण, 15 जणांवर गुन्हा दाखल

 

Nagpur : नागपुरातल्या दीक्षाभूमीवर 1 जुलैला घडलेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. विविध सामाजिक संघटनांच्या 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दीक्षाभूमीवर झालेले हिंसक आंदोलन आणि बांधकाम साहित्याची तोडफोड तसंच आग लवल्याच्या घटनेबाबत ही कारवाई करण्यात आलीय. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडेंचंही नाव आहे. याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 08:52 वाजता

हाथरस चेंगराचेंगरीनंतर बाबा साकार हरी फरार

 

Uttar Pradesh Hathras Update : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बाबा साकार हरी फरार झालाय. पोलिसांकडून बाबाचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा 24 तासांमध्ये अहवाल मागवलाय. आज ते या घटनास्थळाला भेट देणार आहेत. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुख्य सचिवांना हाथरसमध्ये तळ ठोकून राहण्याचे आदेश देण्यात आलेत. या ठिकाणी STF तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

3 Jul 2024, 08:40 वाजता

NEET Exam : NEET परीक्षा घोटाळ्यांनंतर केंद्र सरकार कामाला लागलंय.. NEET PG परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी गृहमंत्रालयानं महत्त्वाची बैठक बोलावली..  या बैठकीमध्ये परीक्षेच्या पूर्व तयारीबाबत चर्चा करण्यात आली.. तसंच काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.. पेपरच्या काही तास आधी प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे.. परीक्षेत कोणतीही गडबड  होऊनये म्हणून वेगवेगळ्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे.  परीक्षेची तारीख ठरताच महिनाभराच्या आतच ही परीक्षा घेतली जाणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 08:35 वाजता

संसद अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

 

Sansad Session : संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत. राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर मोदी दुपारी 1 वाजता सभागृहात बोलतील. 18 व्या लोकसभेचं अधिवेशन 24 जूनला सुरू झालं होतं. या अधिवेशनात  539 सदस्यांनी शपथ घेतली.

3 Jul 2024, 08:33 वाजता

म्हाडाच्या 2 हजार घरांची लवकरच लॉटरी

 

Mhada Lottery : मुंबईत आपलं हक्काचे घर असावं असं स्वप्न पाहणा-यांसाठी आनंदाची बातमी... म्हाडा मुंबईत 2 हजार घरांची सोडत काढणारेय. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडा घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. खिशाला परवडेल अशा किंमतीत सर्वसामान्यांना ही घरं मिळणारेत. म्हाडाची ही घरं मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर या भागांमध्ये उपलब्ध असणारेत.