Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

3 Jul 2024, 22:51 वाजता

कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं 2 सख्ख्या भावांचा मृत्यू 

 

Kolhapur Boy Death : कोल्हापुरात विजेच्या धक्क्यानं 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डेमधली ही दुर्घटना आहे. सुहास पाटील, स्वप्नील पाटील अशी त्यांची नावं आहेत. शेतात अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. शेतात रोप लावून तणनाशक मारण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली. 

3 Jul 2024, 20:06 वाजता

'पोषण आहारात साप सापडला, कुत्राही सापडेल', जितेंद्र आव्हाडांचा  टोला

 

Jitendra Awhad : राज्य सरकारच्या पोषण आहारात सापच काय, काही दिवसांनी कुत्राही सापडेल असा टोला, शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. काहीही करुन वजन वाढवायचं त्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. सांगलीच्या पलूसमध्ये गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणा-या पूरक पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळला. त्यावर आव्हाडांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

3 Jul 2024, 19:31 वाजता

ठाकरेंचा खासदार शिंदेंच्या संपर्कात?

 

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका लागल्या असताना हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत गुप्त भेट झाली. मुंबईतील एका बंगल्यावर ही गुप्त भेट झाली... लोकसभा निवडणूक प्रचारात आष्टीकर आणि बांगर यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र निवडणुकीनंतर आता ते एकत्र आल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय.. आष्टीकर-बांगर-सत्तार भेटीत नेमकं दडलंय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय..

3 Jul 2024, 18:06 वाजता

दिल्लीत पंतप्रधान घेणार टीम इंडियाची भेट

 

Team India Return : टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून T-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीला रवाना झालीय. उद्या सकाळी 6 वाजता ते दिल्ली विमानतळावर उतरतील. तिथून ते थेट ITC मौर्य हॉटेलवर जातील. त्यानंतर त्यांची पंतप्रधानांशी भेट घडवली जाईल. पंतप्रधान निवासस्थानी सकाळी 11 वाजता त्यांची पंतप्रधानांशी भेट होईल. मोदींसोबत टीम इंडिया ब्रेकफास्टही करणार असल्याची माहिती आहे.. त्यानंतर ते थेट मुंबईसाठी रवाना होतील. तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे. विशेष म्हणजे आम्हाला तुम्हा सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडसह हा विजय साजरा करूया, असं आवाहन कॅप्टन रोहित शर्माने मुंबईकरांना केलंय. 

3 Jul 2024, 17:44 वाजता

नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नाही

 

Nashik Ladki Bahini Yojana : नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेची साईट उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आलाय. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, ज्या साईटवर कागदपत्रांची पूर्तता केली जाते, ती साईटच अस्तित्वात नसल्याची माहिती सेतू कार्यालयाचे इन्चार्ज उबेद शेख यांनी दिलीय. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुही ही साईट सुरू करा अशी मागणी महिलांनी प्रशासनानं केलीय. 

3 Jul 2024, 16:48 वाजता

मराठा आरक्षण सुनावणीत खंड पडण्याची भीती 

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टातून मोठी अपडेट आली आहे. मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. कालच्या सुनावणीत विरोध केलेल्या याचिकाकर्त्यांनी आता मागासवर्ग आयोगाला याचिकेत प्रतिवादी करायला तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये खंड पडण्याची भीती आता टळली आहे. तसंच मागासवर्ग आयोगाला कोर्टानं नोटीस जारी केली आहे. त्यावर 10 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

3 Jul 2024, 16:29 वाजता

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठे बदल 

 

CM Ladki Bahini Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेत. अदिती तटकरेंनी सभागृहात योजनेबाबतची माहिती दिलीये. आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आलीये. तसंच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणारेय. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणारेय.
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

3 Jul 2024, 15:49 वाजता

अंबादास दानवे यांचा निर्णय उद्या होणार?

 

Ambadas Danve : अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता...अंबादास दानवेंच्या निलंबनाचा फेरविचार... दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त... उपसभापतींना अंबादास दानवे यांचं पत्र...अंबादास दानवे यांचा निर्णय उद्या होण्याची शक्यता...मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता 

3 Jul 2024, 13:45 वाजता

Bhai Jagtap, Yashomati Thakur & Pratap Sirnaik : धनदांडग्यांच्या घशात शाळा घालायच्या असल्याचा आरोप काँग्रेस आमदार भाई जगतापांनी केलाय तर सरकारला ZP शाळा बंद करायच्या आहेत असं काँग्रेस आमदार यशोमती ठाकुरांनी म्हटलंय. तर शाळांच्या दुरुस्तीचे प्रयत्न करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Jul 2024, 13:41 वाजता

पोषण आहारात 'साप'

 

Vidhansabha Vishwajeet Kadam : सांगलीतल्या या घटनेचे पडसाद सभागृहातही पडताना दिसले..काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमांनी विधानसभेत पोषण आहारासंदर्भात सरकारला जाब विचारला...आणि  दोषींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणीही केली...