Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

9 Jul 2024, 22:13 वाजता

'राजकीय पोळी  विरोधकांचा भाजण्याचा प्रयत्न', देवेंद्र फडणवीसांची टीका

 

Devendra Fadnavis : 'जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटता ठेवण्याचे प्रयत्न' ....राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न....उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर तिखट हल्लाबोल....सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार.... विरोधकांनी बहिष्कार घालून आपले रंग दाखवले....मुख्यमंत्री आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतील अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 Jul 2024, 20:19 वाजता

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट टीमचे नवे कोच, BCCI सचिव जय शाहांची घोषणा

 

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची निवड करण्यात आलीय.. बीसीसीयचे सचिव जय शाह यांनी ही मोठी घोषणा केलीय.. गौतम गंभीर यांनी कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक म्हणून सूत्र हाती घेतली होती. आणि त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकलं होतं. भारतीय क्रिकेट टीमचे सध्याचे कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्ड कपनंतर संपलाय. याआधी 2023 च्या वन डे वर्ल्ड कपनंतरच द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र बीसीसीआयने त्यांना टी-20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र आता टीम इंडियाची जबाबदारी गौतम गंभीर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
 

9 Jul 2024, 19:16 वाजता

'बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी', इलॉन मस्क यांची मागणी

 

Elon Musk On Ballot Paper : इलॉन मस्क यांनी पुन्हा ट्विटरवर, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असं ट्विट केलंय. ईव्हीएमवर निवडणूक घेणं धोक्याचं ठरत असल्यामुळे इलॉन मस्क यांनी हे ट्विट केलंय. यापूर्वी देखील इलॉन मस्क यांनी ईव्हीएम सुरक्षित नसल्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 Jul 2024, 18:16 वाजता

राज्य सरकारच्या आरक्षण बैठकीला विरोधकांचा बहिष्कार

 

Maharashtra Politics : राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतलाय... आम्ही बैठकीला जाणार नाही... आरक्षणाबाबत सरकारनं सभागृहातच भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय.. 

9 Jul 2024, 17:05 वाजता

विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग 

 

Maharashtra Politics : विधान परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय...पावसाळी अधिवेशनातच सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे...भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने भाजपनं सभापतीपदावर दावा केलाय..तर राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तबही होण्याची शक्यता आहे..सभापतीपदासाठी शिंदे गटही आग्रही असल्याची माहिती मिळतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 Jul 2024, 16:40 वाजता

'मिहीर शाहवर मर्डरची केस लावा', आदित्य ठाकरेंची मागणी 

 

Aaditya Thackeray : वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाहवर मर्डरची केस लावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता.. तेव्हा मिहीरला अटक करण्यासाठी 60 तास का लागले.. मिहीर शाहाला लपवण्याचा प्रयत्न झाला का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारलाय.

9 Jul 2024, 16:02 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

 

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.. मुख्य आरोपी मिहीर शाहाच्या पोलिसांनी शहापूरमधून मुसक्या आवळल्या आहेत.. मुंबई गुन्हे शाखेनं मिहीर शाहाला बेड्या ठोकल्या आहेत.. मिहीर शाहाला मदत करणा-या 12 जणांनाही ताब्यात घेण्यात आलंय... त्याचसोबत मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. वरळीत BMW कारखाली कावेरी नाखवा या महिलेला या आरोपीनं क्रुरपणे चिरडलं होतं. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला चिरडल्यानंतर मिहीर फरार झाला होता.. मिहीर शाहाला लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर मिहीर शाहाला जेरबंद करण्यात यश आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 Jul 2024, 15:47 वाजता

भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 55 जणांना चावा

 

Bhiwandi Dog Bite : भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस... कुत्र्याने 50 ते 55 जणांना एकाचवेळी चावा...भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरातील धक्कादायक घटना....चावा घेतलेल्यांमध्ये 18 शाळकरी मुलं, दोघांची प्रकृती चिंताजनक 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

9 Jul 2024, 15:15 वाजता

मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

Mumbai Mantralaya : मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न...पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न

9 Jul 2024, 13:16 वाजता

तेजस ठाकरेंच्या डान्सवर नितेश राणेंची टीका

 

Nitesh Rane On Tejas Thackeray : अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात केलेल्या तेजस ठाकरेंच्या डान्सवरुन नितेश राणेंनी टीका केलीये.. एकाचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो.. तर दुसरा अंबानींच्या कार्यक्रमात नाचतो.. त्यामुळे कुठल्या तोंडानं अदानींना शिव्या घालतात असा सवाल नितेश राणेंनी उपस्थीत केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -