Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा अटकेत

9 Jul 2024, 08:10 वाजता

मनोज जरांगेंची लातूरमध्ये शांतता रॅली

 

Latur Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची आज लातूरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण शांतता रॅली होणारेय. दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांचं शहरात आगमन होईल. त्यांच जंगी स्वागत केलं जाणारेय. शहरातील विवेकानंद चौकातून रॅलीला सुरुवात होईल. सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जाहीर सभा होणारेय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेसाठी खास मंच तयार करण्यात आलाय. इथूनच ते मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Jul 2024, 07:43 वाजता

कोकण रेल्वेचं वेळापत्रक पावसामुळं कोलमडलं

 

Konkan Railway : मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले असून सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. मुंबईहुन सुटणाऱ्या सर्वच गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत असून कोकण रेल्वेने याबाबत कोणतीही अधिसूचना दिली नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Jul 2024, 07:41 वाजता

हवामान विभागाकडून मुंबईत रेड अलर्ट

 

Mumbai Rain Alert : मुंबईत आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यताय. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय.. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ही हवामान खात्याचा रेड अलर्ट आहे. सातारा, कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

9 Jul 2024, 07:31 वाजता

अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर

 

School & Colleges Holiday : बातमीपत्राच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातून ही बातमी येतेय. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणात शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आज बंद असतील. नवी मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे मनपा आयुक्तांनी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आज बंद राहणारेत. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. पुण्यातीलही सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -