9 Jul 2024, 12:17 वाजता
विधानसभेसाठी बच्चू कडूंची तिसरी आघाडी?
Bacchu Kadu : विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताय. लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 11:52 वाजता
वादग्रस्त महिला IAS अधिकाऱ्याची बदली
Pune IAS Transfer : खासगी गाडीवर लाल दिवा लावणं महिला IAS अधिका-याला चांगलंच भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 10:51 वाजता
वडिलांनीच दिला मुलाला पळून जाण्याचा सल्ला?
Worli Hit & Run Case Update : वरळी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आलीये.. राजेश शहांनीच मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. वरळीत कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर आरोपी मिहिर याने त्याचे वडील राजेश शहा यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी, शहा यांनी मिहिर याला पळून जाण्यास सांगितले. तसेच, हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे सांगू, असे सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राजेश शहा यांना न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा आरोपी राजऋषी बिडावत याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. राजऋषी हा शहा कुटुंबीयांचा चालक असून अपघातावेळी मिहिरच्या शेजारी गाडीमध्ये बसला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 10:01 वाजता
खामगावमध्ये पावासाचा हाहाकार
Buldhana Heavy Rain : बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. 12 पैकी 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. जवळपास 250 घरात पुराचं पाणी शिरलं... मुसळधार पावसामुळे 3 घरांचं पूर्णतः नुकसान झालं तर 89 घरांची पडझड झालीय...अनेकांचे संसार उघड्यावर आले. पुरात अडकलेल्यांची आपत्ती शोध बचाव पथक, स्थानीक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कोलारी गावात काही महिला लहान मुलांसह अडकलेल्या होत्या त्यांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आलं. शेती खरडून गेल्याने शेती पीकांचंही अतोनात नुकसान झालं. आवार महसूल मंडाळात 219.3 मिमी पावसाची नोंद झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 09:50 वाजता
अरुण गवळीवर मकोका लावणारी कागदपत्र गहाळ
Arun Gawali : कुख्यात गुंड अरुण गवळीवर मकोका लागू करण्यासाठी लागणारी कागदपत्रं गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 10 वर्षानंतर कागदपत्रं गहाळ झाल्याची कबुली न्यायालयात दिलीय. 2013 साली मुंबईत आलेल्या पुरात कागदपत्रं गहाळ झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय.गेल्या महिन्यात याच कागदपत्रांवरून न्यायालयानं पोलिसांना खडसावलं होतं. कमलाकर जामसंडेकरांच्या हत्या प्रकरणात नागपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गवळी सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 09:34 वाजता
अजित पवार गट विधानसभेसाठी लागला कामाला
Ajit Pawar Camp : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 90 दिवसात प्लॅन बनवला जाणारेय. प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणारेय.तसंच अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचं कॅम्पेन राबवलं जाणारेय. बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेते, आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या बैठकीत येत्या 14 जुलैला बारामतीत जाहीर 'जन सन्मान' रॅली आयोजित करण्याचा ठराव पास करण्यात आलाय. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी असेल असं पक्षानं म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 09:17 वाजता
नागपुरात हिट अँड रनचं सत्र सुरुच
Nagpur Hit And Run : नागपुरात हिट अँड रनचं सत्र सुरूच आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 तासांत या 2 घटना घडल्यायत. एका घटनेत बाईकस्वार तरुणाचा जीव गेला तर दुस-या घटनेत रेल्वेतील अधिकारी गंभीर जखमी झालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 Jul 2024, 09:11 वाजता
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार
Vasant More : पुण्याचे वसंत मोरे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.. आज दुपारी 12च्या सुमारास ते आपल्या कार्यकत्यांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थीतत पक्ष प्रवेश करतील.. मातोश्रीवर त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असेल.. मागील आठवड्यात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्याच वेळी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचं घोषित केलं होतं.. वसंत मोरे याआधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी मध्ये होते.. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेतली होती...आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा - वसंत मोरेंचा आज ठाकरे गटात प्रवेश
9 Jul 2024, 09:07 वाजता
पुण्यात गर्भवती महिलेला 'झिका'ची लागण
Pune Zika Virus Update : पुण्यात आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची लागण झालीय. येरवडयाच्या कळस भागातील 31 वर्षीय महिलेला झिकाची लागण झालीय. त्यामुळे आता झिका रुग्णांची संख्या 12 वर पोहोचलीय. महिलेच्या शरीरावर लाल चट्टे आलेत. तर ताप आणि अंगदुखीसारखे लक्षणं दिसून आली होती. तिच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडं पाठवण्यात आले होते. यातून ती झिका पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. दरम्यान, गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली तर त्याचा थेट परिणाम बालकाच्या मेंदूवर होतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा - पुण्यात गर्भवती महिलेला झिकाची लागण
9 Jul 2024, 08:12 वाजता
मुंबईची पाण्याची चिंता मिटली
Mumbai Dam Water Level : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय.. मुंबईला पाणीपुरठा करणा-या सातही धरणांमधील पाणीसाठा 18 टक्क्यांवर आलाय.. दोन दिवसांतच धरणांतील पाणीसाठा 4 टक्क्यांनी वाढलाय.. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलीये.. धरणांतील जलसाठा खालावल्यानं बीएमसीनं 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतलाय... आता हा निर्णय महानगर पालिका मागे घेणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -