10 Jul 2024, 14:17 वाजता
'रिल'च्या नादात कारचा अपघात
Nagpur Accident : नागपुरात रिल बनवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात झालाय.. अपघातापूर्वी रील बनवताना चा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय... भरधाव कार दुभाजकावर आदळून कारमधील दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जणं गंभीर जखमी झालेत.. नागपुरातील कोराडी रोडवर ही दुर्घटना घडलीये. विक्रम गादे या तरुणाच्या घरी पार्टी करुन हे पाच तरुण मध्य रात्री कारमधून फेरफटका मारण्यासाठी निघाले होते.. गाडीत एक मित्र सोशल मीडियावर रिल्स बनवायला लागला.. त्यानंतर चालकानंही वेगाशी स्पर्धा सुरु केली.. मात्र त्याचा कारवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळून गाडीचा चेंदामेंदा झाला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 12:28 वाजता
मुंबई-गोवा हायवे बंद राहणार
Mumbai-Goa Express Way : मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगाब्लॉक असणारेय..11 ते 13 जुलै दरम्यान 4 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने याबाबत अधिसूचना जारी केलीय. कोलाड इथल्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 12:20 वाजता
Manoj Jarange On Changan Bhujbal : छगन भुजबळांना माझ्याविरोधात सरकारनंच उभं केलंय. सरकारनेच भुजबळांना बळ दिलंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केलाय. लातूरमध्ये शांतता रॅलीदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर हे आरोप केले. तसंच भुजबळांना सत्तेत घेऊन त्यांना मंत्रीपद दिल्यानं पदाचा गैरवापर करत मराठ्यांवर अन्याय करत असल्याचं जरांगेंनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 11:54 वाजता
Vijay Wadettiwar On Worli Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही सरकारवर टीका केलीय. पोलिसांना आरोपी कुठे होता हे माहिती होतं असा आरोप त्यांनी केलाय. तसंच या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणीही केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 11:36 वाजता
Sanjay Raut On Worli Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांनी आरोपीच्या वडिलांसह सरकारवर गंभीर आरोप केलेयत...आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून, आरोपीचे वडील राजेश शहांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप राऊतांनी केलाय...आरोपीने अपघातावेळी ड्रग्जची नशा केली होती...मात्र, ड्रग्जचा अंश सापडू नये म्हणून आरोपीला 3 दिवस फरार ठेवलं...यात पोलिसांवरही शंका उपस्थित करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 11:31 वाजता
ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पुणे पोलीस आक्रमक
Pune Police : पुण्यात जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवलीत तर तुमचं लायसन्स रद्द होऊ शकतं.. पुण्यातील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीये.. या पूर्वी दारु पिऊन गाडी चालवल्यास चालकावर केवळ खटले दाखल केले जात होते.. मात्र आता चालकाचा थेट लायरन्स रद्द होऊ शकतो अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्तांनी दिलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 10:21 वाजता
बीडमध्ये चोरीच्या अफवेचं पेव
Beed : बीड शहरात चोरीच्या अफवांमुळे बीडकर रात्र जागून काढतायत...चोरांच्या भीतीमुळे लोक रात्र रात्र जागून गस्त घालतायत...काही दिवसांपूर्वी बीडमध्ये काही चोरटे सीसीटीव्हीमध्ये रात्री बीडच्या रस्त्यांवर फिरताना चित्रित झाले होते...त्यानंतर मागील पंधरा दिवसांपासून बीड शहरांमध्ये सोशल मीडियासह सर्वत्र याची चर्चा सुरू झाली...त्यामुळे बीड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं...यामुळे नागरिकांनी स्वतःच्या संपत्तीचे संरक्षण व्हावे यासाठी स्वतःच रात्रभर पहारा दिलाय...हातात लाठ्या काठ्या शिट्ट्या वाजवत नागरिकच गस्त घालतायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 10:18 वाजता
Ratnagiri Landslide : रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड-बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे...वारंवार दरड कोसळून वाहतूक ठप्प होत आहे. मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले.. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर फोडण्यात आलाय.. यामुळेच सतत दरड कोसळण्याच्या घटना होत असून वाहतुकीसाठी हा घाट धोकादायक बनलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 10:16 वाजता
Pune Hit & Run Update : पुणे बोपोडी हिट अँड रन प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आलीये.. ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय.. अपघातानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह कार मधील तिघांना ताब्यात घेतलं... त्यांच्या चौकशीत त्यांनी एका वाढदिवसाच्या पार्टीत मद्यपान केल्याचं समोर आलंय... मद्यपान करून घरी येत असताना सिध्दार्थ केंगार हा गाडी चालवत होता. त्याला एका कारने ओव्हरटेक केल्याने त्याला राग आला यामुळे पुढे गेलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने स्वत:ची कार दामटण्याचा प्रयत्न केला आणि अपघात झाल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले.. या अपघातात पोलिस हवालदार समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला असून, पोलिस शिपाई संजोग शिंदे हे जखमी झाले आहेत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
10 Jul 2024, 09:07 वाजता
मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
Marathwada : मराठवाड्यातील एकही जिल्ह्यांमध्ये पावसानं आत्तापर्यंतची सरासरी गाठली नाहीये. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय. जो सरासरीपेक्षा 40% टक्क्यानं कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 50% टक्के पेक्षाही कमी पाऊस बरसलाय. मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतक-यांना सतावतेय. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -