Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 Jul 2024, 22:08 वाजता

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टरप्लान?

 

Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...विधान परीषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत....यासाठी त्यांनी मास्टर प्लान तयार केल्याची माहिती मिळतेय...महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मत, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची...? याची सांख्यिकी रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलीय अशी माहिती सूत्रांनी दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 Jul 2024, 20:22 वाजता

'दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार', खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

 

Amol Kolhe on Devendra Fadnavis :  'दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार'...शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य....'फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती विधानसभा लढवणार होती'  'मात्र आता देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार' असं वक्तव्य खासदार कोल्हेंनी  केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

10 Jul 2024, 19:32 वाजता

'...तर सगळे रस्ते जाम करू', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

 

Manoj Jarange : एकही कुणबी नोंद रद्द केली तर विधानसभा निवडणुकीत तुमचे 288 आमदार पाडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच कुणबी नोंद रद्द झाल्यास राज्यातील सगळे रस्ते जाम करु अशा इशाराही त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटलांची जनजागृती शांतता रॅली धाराशिवमध्ये पोहोचली. इथे आयोजित सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर घणाघाती टीका करत हा इशारा दिला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 Jul 2024, 19:18 वाजता

मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

 

Marathwada Water : मराठवाड्यातील एकही जिल्ह्यांमध्ये पावसानं आत्तापर्यंतची सरासरी गाठली नाहीये. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय. जो सरासरीपेक्षा 40% टक्क्यानं कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सरासरीच्या 50% टक्के पेक्षाही कमी पाऊस बरसलाय. मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतक-यांना सतावतेय. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 Jul 2024, 18:16 वाजता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर !, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

 

Good news for State Government Employees : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठे गिफ्ट....शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ....१ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू...विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न

10 Jul 2024, 17:55 वाजता

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून नाना पटोलेंची माघार

 

MCA  Election 2004 : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA अध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. मात्र या निवडणुकीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माघार घेतली आहे. दुपारी नाना पटोले आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांनी MCA अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र पटोलेंनी त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता MCAचे सचिव अजिंक्य नाईक, तसंच MCAच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होणार आहे. यात आता क्रिकेटचं मैदान कोण मारणार याकडे लक्ष लागलंय. MCA अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालंय. 

10 Jul 2024, 17:22 वाजता

वडेगाव ZP शाळा विद्यार्थ्यांविना पडली ओस 

 

Wadegaon ZP School : गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या ZP शाळेमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळा ओस पडलीये... शाळेत एकूण 7 वर्ग असून 112 विद्यार्थी आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असे 2 दोन जण कार्यरत आहे... तर याठिकाणी एकूण 5 शिक्षकांची गरज आहे... त्यामुळे उर्वरित शिक्षकांची जोपर्यंत नियुक्ती होत नाही तो पर्यंत विद्यार्थांना शाळेत पाठवणार नाही... असा पवित्रा पालकांनी घेतलाय... तर शिक्षकांची भर्ती करणार असून विद्यार्थ्यांना वर्गात येण्याची विनंती शाळेकडून करण्यात आलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 Jul 2024, 16:51 वाजता

नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रन, सिटी लिंक बसने शाळकरी मुलीला चिरडलं

 

Nashik Hit And Run Case : नाशिकमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडलीय सिटी लिंक बसनं 6 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडलं. अपघातानंतर बस चालक फरार झाला. तर चालक दारू प्याला असल्याचा आरोप जमावानं केला. गंभीर म्हणजे शहरामध्ये 3 दिवसांतली ही चौथी हिट अँड रनची घटना घडलीय.  

10 Jul 2024, 16:16 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण, मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

 

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आपल्याला पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं मिहीर शाहनं सांगितलं. तर मिहीर शाह अपघातानंतर कोणाला भेटला, तसंच त्याला कोणी मदत केली याची चौकशी करणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं. तसंच पोलिसांकडे पूर्ण माहिती असून, मुख्य आरोपीच्या कस्टडीची गरज नसल्याचं बचाव पक्षानं सांगितलं. तर या गंभीर प्रकरणात अधिक चौकशीची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं मान्य करत कोर्टानं मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 Jul 2024, 15:39 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण, जुहूतील तपस बारवर बुलडोझर कारवाई

 

Worli Hit And Run Case : जुहूतील तपस बारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे...वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणातील बारवर कारवाई करण्यात आली आहे.....तपस बारमध्येच मिहीरनं केलं होतं मद्यपान....तपस बारवर मुंबई मनपाचा बुलडोझर

बातमीचा व्हिडीओ पाहा-