Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 12 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून

14 Jul 2024, 21:55 वाजता

विशाळगडावरील अतिक्रमण उद्यापासून हटवणार, मुख्यमंत्र्यांचं संभाजीराजेंना आश्वासन

 

Vishalgad Update : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून सुरू केली जाणाराय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तसं आश्वासन दिल्याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली... अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेंनी चलो विशाळगडचा नारा दिला होता. त्यानुसार संभाजीराजे आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते रविवारी विशाळगडावर पोहोचले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संभाजीराजे विशाळगडावरून कार्यकर्त्यांसह परतले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

14 Jul 2024, 21:32 वाजता

रत्नागिरीत जोरदार पाऊस, जिल्ह्यातील शाळा, कॉलेजना उद्या सुट्टी

 

Ratnagiri School : राज्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावलीये. जोरदार पावसाचा कोकणाला फटका बसल्याचं दिसून आलंय. खबरदारीसाठी प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीये. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

14 Jul 2024, 21:05 वाजता

रत्नागिरीत जोरदार पाऊस, खेड शहरात पूरस्थिती निर्माण

 

Ratnagiri Rain : रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेडच्या शिवतर गावातील रस्ता वाहून गेला.. पोत्रिक मोहल्ला भागात नागरिक अडकले आहेत. तर NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तर पुण्यातूनही NDRFची आणखी एक टीम या ठिकाणी दाखल होणार आहे. सध्या NDRFची प्रत्येकी एक टीम सध्या चिपळूण आणि खेडमध्ये आहे. तर जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

14 Jul 2024, 14:16 वाजता

'जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या', लक्ष्मण हाकेंचं वादग्रस्त विधान

 

Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. मराठा तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोपही हाकेंनी केलाय.

14 Jul 2024, 13:41 वाजता

अजित पवारांच्या अडचणीत वाढ?

 

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला आव्हान देत सात सहकारी साखर कारखान्यांनी सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्यात. या याचिकांवर 25 जुलैला सुनावणी होणारेय. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी कोर्टात धाव घेतलीय. दरम्यान, क्लीन चीट मिळणं हाच मोठा घोटाळा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर सर्व बाजू ऐकून घेऊन कोर्ट योग्य निर्णय देईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी केलाय.

14 Jul 2024, 13:13 वाजता

'आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

 

Manoj Jarange on Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी अजित पवार आणि फडणवीसांवर गंभीर आरोप केलेयत...अजित पवारांचे 2 ते 3 पालकमंत्री मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत...तर मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा दबाव आहे...असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय...

14 Jul 2024, 12:25 वाजता

'काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटले', आमदार हिरामण खोसकरांचा दावा

 

Hiraman Khoskar : विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस मतदानावर सुरू असलेल्या चर्चेवरून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर संतप्त झालेत. मतदान काँग्रेसलाच केलं त्यामुळे बदनामी थांबवा, असं आवाहन त्यांनी थेट नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांना केलंय. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार फुटलेत. त्यांना कुणीही बोलत नाही, असा खळबळजनक दावा हिरामण खोसकरांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

14 Jul 2024, 12:11 वाजता

गुहागरच्या पाचेरी सडा गावात डोंगर खचला

 

Guhagar Landslide :  गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचू लागलाय.. कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. पाचेरी सडा गावाजवळील डोंगर खचू लागल्यानं या डोंगरालगतच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.. दरम्यान या भूस्खलनामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी टाकीही खचलीये.. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतोय.. डोंगर खचू लागल्यानं गावक-यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

14 Jul 2024, 11:16 वाजता

रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

 

Ratnagiri Jagbudi River : रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी...खेडमध्ये शिरलं पुराचं पाणी...खेड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरुच...नागरिकांना सतर्कतेचा इशारा
 

14 Jul 2024, 10:36 वाजता

शिवसेना चिन्ह, पक्षाबाबत सुनावणी लांबली

 

 

Shivsena : शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आलीये.. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल केले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती, परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणावर १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे.