Possible Candidates of MNS for Election : विधानसभेला मनसे 225-250 उमेदवार उभे करणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Possible Candidates of MNS for Election : विधानसभेला मनसे 225-250 उमेदवार उभे करणार

26 Jul 2024, 19:14 वाजता

नांदगावकर, देशपांडे, सरदेसाईंना तिकीट.. शालिनी ठाकरे, राजू पाटील, बाबरना उमेदवारी?

 

Possible Candidates of MNS for Election : येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यानुसार मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या गेल्यात. 225 ते 250 जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे. यापैकी मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून संदीप देशपांडे, माहीममधून नितीन सरदेसाई, जोगेश्वरीमधून शालिनी ठाकरे यांच्या नावांची चर्चा आहे. तर  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. 

 

26 Jul 2024, 17:44 वाजता

मेळघाटातील झेडपी शाळेच्या पोषण आहारात आढळल्या अळ्या

 

Melghat Students Health Issue : मेळघाटच्या गडगाभांजुप येथील जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहाराच्या मिलेट्समध्ये अळ्या आढळून आल्या.. अशा प्रकारे अळ्या आढळल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्स बार दिले जातात.. त्या मिलेट्स बारमध्येच अळ्या आढळून आल्या आहेत.. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.. शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

26 Jul 2024, 16:35 वाजता

शिवप्रेमींच्या विरोधानंतर घोडबंदर किल्ला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मागे

 

Ghodbundar Fort Update : घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा वादग्रस्त ठराव अखेर मागे घेण्यात आला आहे. मिरा भाईंदर नगरपालिकेने चक्क घोडबंदरचा ऐतिहासिक किल्ला भाडे तत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. मात्र शिवप्रेमींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर नगरपालिकेनं आपला ठराव मागे घेतला. मीरा भाईंदर नगरपालिकेने राज्य सरकारकडून हा किल्ला देखभालीसाठी आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र पाचशे वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला थेट भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय नगरपालिकेनं घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी शिवसेनेनं पालिका आयुक्तांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

26 Jul 2024, 14:08 वाजता

'लाडक्या बहिणीं'ना मोफत सिलेंडर मिळणार

 

Gas Cylinder : आता लाडक्या बहिणींना मोफत सिलिंडरही मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. या योजनेचा लाभ देताना एका कुटूंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलिंडर दिलं जाणारेय. तसंच गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच याचा लाभ मिळणारेय. लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारीही अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं केल्याचं समजतंय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचा आधार लिंक असणं गरजेचं आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणा-यांना लगाम लागेल.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 13:38 वाजता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत

 

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत आलीय...अर्थ खात्याकडून निधीबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, त्यात दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये योजनेसाठी लागणार आहेत...त्यामुळे मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली असली तरी अर्थ खात्याला निधी कसा द्यायचा याची चिंता आहे...अशी माहिती अर्थ खात्यातील सूत्रांनी दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 13:09 वाजता

संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

 

Sanjay Raut On Eknath Shinde : आमदार अपात्र प्रकरणी शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यावरून राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय...शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवलंय...सुप्रीम कोर्टाने संविधान आणि घटनेचा मान राखला तर 24 तासांमध्ये सर्व अपात्र ठरतील...त्यांचा पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल असा दावा राऊतांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 12:52 वाजता

Pooja Khedkar Update : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी YCM रुग्णालयात आधार कार्ड देखील दिल्याचं समोर आलंय...7 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र YCM रुग्णालयाने पूजा यांना दिल होतं... आधी केवळ रेशन कार्ड दिल्याचंच सांगण्यात येत होतं...मात्र, आता रुग्णालयाचे डीन राजेंद्र वाबळे यांनी पूजा यांनी आधार कार्ड दिल्याचं म्हटलं होतं, ते आधार कार्ड समोर आलंय...दोन्ही ओळख पत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे, आधारकार्डवर पुण्यातील नॅशनल हौसिंग सोसायटी औंध पुणे येथील पत्ता दिलाय, तर रेशनकार्डवर आळंदी- देहू रस्ता तळवडे येथील कंपनीचा पत्ता दिलाय...यामुळं पूजाला दिलेलं दिव्यांग प्रमाणपत्र हे खरंच नियमाला धरून देण्यात आलंय का? डॉक्टरांना दिलेली क्लिन चीट यावर प्रश्न निर्माण होतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा

26 Jul 2024, 12:45 वाजता

विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार येणं गरजेचं - प्रकाश आंबेडकर

 

Prakash Ambedkar On OBC Reservation : ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे, असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी केलंय.  जोपर्यंत 100चा आकडा गाठत नाही, तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे, असं ते म्हणाले. दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. '225 समाजाचे उमेदवार निवडून येतील. असं स्टेटमेंट शरद पवारांनी केलंय, यानंतर वातावरण चिघळलंय', असा गंभीर आरोप आंबेडकरांनी पवारांवर केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 12:24 वाजता

Ravindra Chavan : ठाण्यात मित्र पक्षाच्या मदतीची अपेक्षा ठेऊ नका...अशा सूचना मंत्री रवींद्र चव्हाणांनी पदाधिका-यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...ठाणे विधानसभा क्षेत्रात पाच वर्षांपूर्वी युती असतानाही मित्र पक्षाकडून संजय केळकर यांना पुरेशी मदत मिळाली नव्हती...त्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वबळावर विजयाचा प्रयत्न करा, अशी सूचनाही बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...ठाणे विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाकडून दावा सांगत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्यायत...त्यामुळे हा मतदारसंघ शिंदेंना सोडला जाणार नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय...या बैठकीत कोकणातील 39 जागांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 12:22 वाजता

विधानसभेत महायुती 165 जागा जिंकणार - हसन मुश्रीफ

 

Hasan Mushriff : आगामी विधानसभेची निवडणूक बहुरंगी होणारेय. यात महायुती 165 जागा जिंकणार, असा विश्वास  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. मुश्रीफांनी पंढरपूरमध्ये येऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.