Possible Candidates of MNS for Election : विधानसभेला मनसे 225-250 उमेदवार उभे करणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 26 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Possible Candidates of MNS for Election : विधानसभेला मनसे 225-250 उमेदवार उभे करणार

26 Jul 2024, 07:46 वाजता

साताऱ्यात पावसाचा रेड अलर्ट

 

Satara Rain Red Alert : सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. सध्या धरणातून 20 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक लक्षात घेता, धरणातून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणारेय.

26 Jul 2024, 07:27 वाजता

मुंबईत पावसाची उसंत, रस्ते वाहतूक सुरळीत, रेल्वे वाहतूक उशिरानं

 

Mumbai Rain Update : मुसळधार पडणा-या पावसाने मुंबईत उसंत घेतलीय...त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असून, शाळा, कॉलेज आज मुंबईत सुरू आहेत...मात्र, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतायत...मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय...शाळा कॉलेज आज सुरू असून, अधिक माहितीसाठी शाळा, कॉलेज व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय...

26 Jul 2024, 07:18 वाजता

कोल्हापुरात 2 दिवस शाळा आणि कॉलेजना सुट्टी

 

Kolhapur School & College Holiday : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येतेय.. कोल्हापूरच्या शाळा आणि कॉलेजेसना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. त्यामुळे 26 आणि 27 जुलै असे दोन दिवस शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडया, सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक – माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना सुट्टी राहील.. 

26 Jul 2024, 07:16 वाजता

पुणे-मुंबई धावणाऱ्या 3 ट्रेन आज रद्द

 

Pune, Mumbai Train Cancel : मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या तीन ट्रेन आज रद्द करण्यात आल्यात. डेक्कन क्वीन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई शहरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Jul 2024, 07:12 वाजता

पावसाचा इशारा, शाळा कॉलेजेना सुट्टी

 

School & College : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगलीमधल्या सर्व शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. आज देखील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.. अतिवृष्टीच्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दुसरीकडे नवी मुंबई, ठाणे शहरातल्या शाळांनाही आज सुट्टी देण्यात आलीय. ठाणे, नवी मुंबई मनपाच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक तसंच  माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर झालीय.. हवामान विभागाने ठाणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसंच कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.  

26 Jul 2024, 06:55 वाजता

पुणे विद्यापीठाच्या 26 आणि 27 जुलैच्या परीक्षा रद्द : परीक्षा विभागाची माहिती

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने 26 व 27 जुलैच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. "पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडून प्राप्त आदेशानुसार पुणे मधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी अतिवृष्टी कारणामुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. वरील बाबींचा विचार करता प्राप्त आदेशानुसार, परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुक्त व दुरुस्त अध्ययन प्रशाला यांच्या दिनांक 26 व 27 जुलै 2024 रोजी आयोजित परीक्षा रद्द करण्यात येत असून सदर दोन दिवसीय विषयांच्या परीक्षा पुनर्नियोजनाचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. उर्वरित परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील याची कृपया नोंद घ्यावी. याबाबत काही शंका असल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्रतिनिधी यांनी तत्काळ परीक्षा विभागाशी संपर्क साधावा.  सर्व संलग्नित परीक्षा केंद्राचे मा. प्राचार्य, समन्वयक आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी सदर सूचनेची नोंद घेऊन आपल्या स्तरावरून सर्व संबंधित विद्यार्थी यांना सूचना अवगत करण्यासाठी कार्यवाही करावी ही विनंती," असं परीक्षा विभागाने म्हटलं आहे.