Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Jun 2024, 14:36 वाजता

कोस्टल रोडवर कारचा अपघात

 

Mumbai Coastal Road Accident : कोस्टल रोडच्या भुयारी मार्गामध्ये BMW कारचा अपघात झालाय. भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार भुयारी मार्गातील भिंतीला धडकली. आज रविवार असल्यानं भुयारी मार्गात वाहनांची वर्दळ कमी होती. याचा फायदा घेत कारचालक सुसाट कार चालवत होता. मात्र, कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 12:30 वाजता

'एकला चलो रे ची भूमिका नको'

 

Mumbai BJP Meeting : महायुतीतल्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जायचंय...आता एकला चलो रे ची भूमिका नको, स्थानिक पातळीवर समन्वय राखा असे आदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रभारींनी दिलेयत...काल भाजप कोअर कमिटीची बैठक राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली...बैठकीत प्रभारींनी उपस्थित नेत्यांना हे आदेश दिलेयतय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 11:32 वाजता

पिंपरीत अजित पवार गटाला धक्का?

 

Pimpri Ajit Pawar Camp : पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 11:29 वाजता

मोरपीस विक्रीला बंदी

 

Pune Peacock Feather Crime : मोरपिसाची विक्री केल्यास आता कठोर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने मोराची पिसं अथवा साहित्य विक्रीला बंदी घातलीय.  वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मोरांची शिकार करून मोरपिसांची विक्री करणं हा गुन्हा आहे. मोराची शिकार करून मोरपिसे विकणाऱ्याला तीन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे कुठेही मोरपीस विक्री होत असेल तर वनविभागाला संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 10:37 वाजता

एल 3 बार प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

 

Pune L3 Bar Update : पुण्यातील एल थ्री बार प्रकरणातील सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. या आरोपींनी शहरातील अन्य बार तसेच पब मध्ये अमली पदार्थांची विक्री केल्याचा संशय पोलिसांना आहे.. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागीतली.. त्यानंतर न्यायालयानं या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 जुलैपर्यंत वाढ केलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा  - 

30 Jun 2024, 10:28 वाजता

राहुल द्रविडकडून टीम इंडियाचं कौतुक

 

Rahul Dravid On Team India : टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकून कोच राहुल द्रविडला निरोपाची भेट दिलीय. तर टीम इंडियाची ही तर सुरुवात आहे, असं कौतुक कोच राहुल द्रविडनं केलंय. टीम इंडिया भविष्यात अनेक ट्रॉफी जिंकणार, असा विश्वासही द्रविडनं व्यक्त केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 09:33 वाजता

पालखी सोहळ्यात ड्रोन वापराला बंदी

 

Pune Drone : पुण्यात पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमे-याच्या वापरला बंदी घालण्यात आलीये.. खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणं गरजेचं आहे.. बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय.. ड्रोन कॅमे-याच्या चित्रिकरणाचा गैरवापर होऊ शकतो तसंच संभाव्य घातपात टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा -

30 Jun 2024, 09:13 वाजता

सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

 

Beed Murder : बीडच्या परळीत रात्री झालेल्या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झालेयत...तर ग्यानबा गिते गंभीर जखमी झालेयत...शहरातील बँक कॉलनीत ही घटना घडलीय...या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय...जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत...दरम्यान रात्री बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी यातील आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना केल्यायत...दरम्यान मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाजूने होते...परंतु काही काळानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी जवळीक साधली होती. यानंतर आता ही घटना घडल्याने यामागे काही राजकीय वाद होता का? हे पोलीस तपासात स्पष्ट होऊ शकणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

30 Jun 2024, 09:05 वाजता

Maauli Palkhi : विठू नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे स्वर याने संपूर्ण आळंदी नगरी भक्तीमय रसात नाहून निघालीये... आळंदीच्या गांधीवाडा इथं मुक्काम घेतल्यानंतर माऊलींची पालखी आज पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालीये.. संगमवाडीमध्ये माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेईल.. त्यानंतर पुण्यातील भवानी पेठ इथं पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल.. 

30 Jun 2024, 08:51 वाजता

रोहित शर्माची टी-20 मधून निवृत्ती

 

Rohit Sharma & Virat Kohli Retirement : टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जात आहे... यातच कॅप्टन रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. तर विराट कोहलीने फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर टी-20 वर्ल्डकपमधून निवृत्ती होत असल्याची माहिती दिली. हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असल्याचं कोहली म्हणाला