Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Jun 2024, 22:47 वाजता

BCCIकडून टीम इंडियाला 125 कोटींचं बक्षीस जाहीर

 

BCCI : बीसीसीआयचे सचिव जय शाहा यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय...टी-२० वर्ल्डकप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन करताना जय शाहा यांनी हे बक्षीस जाहीर केलंय...ही बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचं ते म्हणालेत...सोशल मीडिया साईट एक्सवर त्यांनी याबाबत माहिती दिलीये...संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन केल्याबाबत त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलंय...उत्कृष्ट कामगिरीबाबद सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचंही त्यांनी अभिनंदन केलंय...

30 Jun 2024, 22:26 वाजता

प्रसाद लाड विधानसभा लढण्यास इच्छुक

 

Prasad Lad : भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलीय. पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढणार, असं लाड यांनी म्हटलंय. सध्या सायनमध्ये भाजपचेच आमदार आहेत...त्यामुळे सायनमधून लाड यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताय...

30 Jun 2024, 20:48 वाजता

'मातोरीतील दगडफेकीमागे भुजबळ', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

 

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : बीडच्या मातोरीत झालेली दगडफेक छगन भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय...मातोरीतील दगडफेक नियोजित होती...हाकेंची रॅली चार वाजता आली आणि ते आठ वाजता का आले? असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय.....

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Jun 2024, 19:06 वाजता

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का?

 

Ajit Pawar Group : पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय...शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलंय...महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं...आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय...भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय...त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे...

30 Jun 2024, 18:04 वाजता

रवींद्र जडेजा इंटरनॅशनल T-20 स्पर्धेतून निवृत्त

 

Ravindra Jadeja : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यानंही आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अत्यंत कृतज्ञतेनं आपण आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याचं, रवींद्र जडेजानं इंस्टाग्रामवर पोस्ट करुन जाहीर केलं. देशासाठी नेहमीच आपण सर्वोत्तम दिलं आणि यापुढेही क्रिकेटच्या इतर फॉम्रॅटमध्ये ते देत राहू असा विश्वासही त्यानं दिला. तर टी-20 वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न होतं ते सत्यात उतरलं. तसंच आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधला तो सर्वोच्च क्षण होता, अशी अत्यंत आनंद आणि गौरवाची भावना त्यानं व्यक्त केली. सोबतच अगणित आठवणी, प्रोत्साहन आणि ठाम पाठिंब्यासाठी त्यानं देशवासीयं आणि चाहत्यांचे आभारही मानलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Jun 2024, 17:39 वाजता

अबू सालेमला विशेष कोर्टाकडून दिलासा

 

Abu Salem : 1993 सालातील मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला विशेष कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खटल्या दरम्यान तुरुंगात काढलेल्या दिवसांची मोजतात जन्मठेपेच्या शिक्षेत करण्यात यावी, अशी मागणी आरोपी अबू सालेमनं कोर्टाकडं केली होती. कोर्टानं ही मागणी मान्य केलीय. त्यामुळे सालेमच्या शिक्षा कमी होणारेय. तब्बल 12 वर्षांची शिक्षा कमी होणार आहे. त्यामुळे गुंड सालेम लवकरच तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

30 Jun 2024, 17:12 वाजता

सुजाता सौनिक पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्त

 

Sujata Saunik : ज्येष्ठ IAS अधिकारी सुजाता सौनिक यांना राज्याच्या पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला IAS अधिका-याची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकार महिलांचा सन्मान करत असल्याचा संदेश यातून महायुती सरकारनं दिला आहे. सुजाता सौनिक गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्या 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आज संध्याकाळी डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Jun 2024, 16:36 वाजता

भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील 5 जण गेले वाहून 

 

Bhushi Dam : लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश असून, त्यांचं शोधकार्य सुरू आहे. 

30 Jun 2024, 16:11 वाजता

पुणे पोलिसांची भिडे गुरूजींना नोटीस

 

Sambhaji Bhide : पुणे पोलिसांनी भिडे गुरूजींना नोटीस बजावली आहे. तुकाराम महाराज पालखी दर्शनावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या अशी नोटीस पोलिसांनी बजावलीये. यापूर्वी भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणली होती, तसंच तेढ निर्माण करणारी भाषणंही केली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस पोलिसांनी त्यांना दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Jun 2024, 14:42 वाजता

नाशिक रोड परिसरात दोन गटांत राडा

 

Nashik : वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषादरम्यान नाशिकरोड परिसरात दोन गटात तुफान राडा झाला... यावेळी एकमेकांवर गोळीबार आणि कोयत्याचे वारही करण्यात आले.. देवळाली गाव आणि विहितगाव दरम्यान हा राडा  झाला.. यात 5जण जखमी झालेत.. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. तर सर्व जखमींना नाशिकच्या खाजगी रुंगणल्यात दाखल करण्यात आलंय. 

बातमी पाहा -