11 Nov 2024, 12:31 वाजता
मुंबईत माझं घर नाही - फडणवीस
Devendra Fadanvis : मुंबईत कधी स्वत:चं घरं घेण्याचा विचार केला नाही. महाराष्ट्रात 20 मुख्यमंत्री झालेत. मात्र मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याच मुंबईत घरं नाही, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. नागपुरच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच मी कधी स्वत:चा विचार केला नाही. नेहमी समाजासाठी काम केलं, असं त्यांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Nov 2024, 11:59 वाजता
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीममधून उमेदवारी मिळाल्यानतंर उद्धव ठाकरेंना धक्का बसल्याची टीका अमित ठाकरेंनी केलीय... तसेच माहीममधून कुणीही उभं राहिलं तरीही जिंकून येणार असल्याचं अमित ठाकरे म्हणालेत.. तर अमित ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय.. अमित ठाकरे लहान आहे. त्यांनी शिकावं असा पलटवार संजय राऊतांनी केलाय..
11 Nov 2024, 11:45 वाजता
शाहू महाराजांचा भाजपवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपकडून समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप खासदार शाहू महाराजांनी भाजपवर केलाय. तर अर्ज मागे घेण्याची मधुरिमाराजें यांच्यासह मालोजीराजेंचीही इच्छा होती, असं स्पष्टीकरणही शाहू महाराजांनी दिलंय.
11 Nov 2024, 10:00 वाजता
धीरज देशमुखांच्या सभेत रितेश देशमुखांची टोलेबाजी
Latur Ritesh Deshmukh : काँग्रेसचे उमेदवार आणि भाऊ धीरज देशमुखांच्या सभेत रितेश देशमुखांची टोलेबाजी पाहायला मिळाली. 20 तारखेला इतक्या जोरात बटण दाबा की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, असा टोला रितेश देशमुखांनी लगावलाय. भाजप उमेदवार रमेश कराडांवर त्यांनी टीका केली. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही झापूक झुपूक वारं वाहतंय, असंही रितेश देशमुखांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Nov 2024, 09:51 वाजता
भंडाऱ्यात अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भंडा-याच्या तुमसर मोहाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शिवचरण वाघमारेंवर कारवाई करण्यात आलीय... त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं कारवाई केलीय. नावाचा आणि चिन्हाचा गैरवापर केल्याचा ठपका शिवचरण वाघमारेंवर ठेवण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Nov 2024, 09:25 वाजता
बेळगावात भरतीसाठी आलेल्या तरुणांवर पोलिसांचा लाठीचार्ज
Belgav : बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरती सुरू असून यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर मधील मैदानावर युवकांनी तोबा गर्दी केली होती. जवळपास 30 हजाराहून अधिक युवक भरतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलीस आणि बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांना या युवकांवर लाठीमार करावा लागला. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन दोन युवक जखमी झाले. प्रादेशिक सेनेच्या 106 प्यारा, 115 महार,. 125 दि गार्ड्स इन्फंट्री बटालियन मधील सैनिकांच्या 257 व क्लार्कच्या 53 जागांसाठी बेळगावात अखिल भारतीय मेळावा सुरू आहे. मराठा लाईफ इन्फंट्री च्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर ही भरती सुरु आहे.
11 Nov 2024, 08:50 वाजता
जरांगेंच्या मागणीला विरोध आहे भाजपनं जाहीर करावं - आंबेडकर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपनं मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध आहे हे जाहीर करावं, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी भाजपला केलंय. बीडच्या माजलगावमधील सभेत त्यांनी हे आव्हान केलंय. आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आमदार विधानसभेत गेले पाहिजेत असंदेखील आंबेडकर म्हणालेत. यावेळी त्यांनी एससी, एसटीमधील आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या वर्गीकरण आणि नॉन क्रिमीलेयरच्या निर्णयावर संताप व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
11 Nov 2024, 08:48 वाजता
माहीमवासीय माझ्यासोबत आहेत - अमित ठाकरे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघात आपल्यासमोर कितीही उमेदवार असले तरी फरक पडत नाही. कारण माहीमवासीय आपल्यासोबत आहेत, असा विश्वास माहीममधले मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंनी व्यक्त केला. माहीममध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. माहीममधल्या नागरिकांनी खूप सहन केलंय. इथल्या समस्या सहज सुटणा-या आहेत, यासाठी आपल्याला एकदा संधी द्या, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं. विधानसभा निवडणुकीतल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी हे आवाहन केलं. तर अमित उभा असताना आपण भिका मागणार नाही, त्याला निवडून नक्की आणणार, असा दावा यावेळी राज ठाकरेंनी केला.
11 Nov 2024, 07:45 वाजता
काँग्रेसची बंडखोर 21 नेत्यांवर कारवाई
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसकडून 21 बंडखोरांचे निलंबन करण्यात आलेय.. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या 21 जणांवर काँग्रेसने ही कारवाई केली आहे.. या 21 जणांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचे कारण देत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेय.. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील राजेंद्र मुळक,याज्ञवलक्य जीचकार आणि चंद्रपाल चौकसे यांच्यावरही कारवाई झालेली आहे
11 Nov 2024, 07:32 वाजता
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व दिग्गज राजकीय नेते आज प्रचाराचा धाडका लावणारेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज राज्यात 6 सभा होणारेत. मुख्यमंत्री मुंबईसह अहिल्यानगर, जालन्यात सभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिम, जळगाव जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावणारेत. देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदियासह मुंबईत प्रचार सभा घेणारेत. शरद पवार आज धुळे, जळगाव जिल्ह्यात 5 सभा घेणार आहेत. दोंडाईचा, पारोळा, मुक्ताईनगर, जामनेर आणि शेवटची सभा धरणगावमध्ये होणारेय.