Interesting Facts : भारतीय घरांमध्ये दूध उकळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. गाव असो की शहर, आज सगळीकडे लोक बाजारातून पॅकेट दूध आणतात. नंतर हे दूध उकळून चहासह इतर गोष्टींमध्ये वापरले जाते. दूध उकळण्याचा मुख्य उद्देश त्यात असलेले बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायने नष्ट करणे हा आहे. काही लोकांचा असाही विश्वास आहे की दूध उकळल्याने त्यात बॅक्टेरिया तयार होण्याची प्रक्रिया कमी होते. त्यामुळे दही किंवा दूध खराब होण्याची शक्यता कमी होते. पूर्वी दूध मुख्यत: गाय किंवा म्हशीचे थेट मिळायचं. पण सध्या आपण वापरत असलेले दूध पॅकेटमध्ये भरण्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत अनेक प्रकारच्या प्रक्रियेतून जाते. याला पाश्चरायझेशन म्हणतात. आता प्रश्न असा पडतो की पॅकेज केलेले दूध उकळायचं का? (Should you boil packet milk before drinking or not Interesting Facts in marathi )
आज बहुतेक पॅकेज केलेले दूध पाश्चराइज्ड आहे. म्हणून, त्यांना उकळण्याची आवश्यकता नाही. असे असूनही, आजही भारतीय घरांमध्ये महिला दूध उकळणे, साठवणे किंवा पिणे पसंत करतात. शिवाय 'जेव्हा पॅकेज केलेले किंवा पाश्चराइज्ड दूध येतं, तेव्हा ते पिण्यापूर्वी उकळण्याची गरज वेगवेगळ्या शक्यतांवर अवलंबून असते. पाश्चरायझेशन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दूध एका विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट तापमानात ठेवले जाते,' दूध विशिष्ट तापमानाला गरम केले जातं जेणेकरून त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि दुधाचे पौष्टिक मूल्य देखील राखलं जातं.
डॉ. भावेश गुप्ता यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तज्ज्ञ सांगतात की, कच्चे दूध प्यायल्याने कॅम्पिलोबॅक्टर, क्रिप्टोस्पोरिडियम, ई.कोली, लिस्टेरिया, ब्रुसेला आणि साल्मोनेला सारखे जंतू व्यक्तीच्या शरीराच्या संपर्कात येऊ शकतात.
त्यामुळे अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत पाश्चराइज्ड दूध न उकळताही प्यावे. कारण जेव्हा ते पाश्चरायझेशन केले जाते तेव्हा बहुतेक जीवाणू आणि जंतू नष्ट होतात. अशा परिस्थितीत तुम्ही कच्चे पॅकेट दूध वापरत असाल तरी ते पूर्णपणे सुरक्षित आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरोदर महिला आणि मुलांनी पॅकबंद दूध उकळल्यानंतरच प्यावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)