Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

11 Nov 2024, 22:34 वाजता

मला लाईटली घेतलं म्हणून मविआचं सरकार पाडलं- मुख्यमंत्री

 

CM Shinde on Uddhav Thackeray  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवलीच्या प्रचार सभेत एक खळबळजनक विधान केलंय..मला लाईटली घेतलं म्हणून मविआचं सरकार पाडल्याचा गौप्यस्फोट केलाय.. तर संघर्षातून पुढे आलोय त्यामुळे धमक्यांना घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी विरोधकांना दिलाय.. ते चांदिवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीपमामा लांडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते...

11 Nov 2024, 22:10 वाजता

राज्यात येणाऱ्या दिल्लीश्वरांची तपासणी व्हावी- आदित्य ठाकरे 

 

Aditya Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर आदित्य ठाकरे यांनीही एक्स समाजमाध्यमावर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात येणा-या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणा-या राज्यकर्त्यांचीही तपासणी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. 

11 Nov 2024, 21:57 वाजता

'मतदारांना टोपी घालणाऱ्यांना घरी बसवा',शिंदेंकडून राजेश टोपेंचा समाचार

 

CM Shinde on Raje Tope : 25 वर्षात विकासाच्या नावाने बोंबाबोंब असून ऐवढी वर्ष मतदारांना टोपी घालणा-यांना घरी बसवा... डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा अशा शब्दात जालन्याच्या घनसांगवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी शरद पक्षाचे आमदार राजेश टोपेंचा समाचार घेतला..... 

11 Nov 2024, 18:17 वाजता

अकोल्यात वंचितचा अपक्षाला पाठिंबा

 

Akola Vanchit Party : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिलाय.. भाजपसोबत बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेले हरीष अलिमचंदानी यांना वंचितनं पाठिंबा दिलाय.. वंचितच्या अधिकृत उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे वंचितकडून अलिमचंदानी यांना पाठिंबा देण्यात आलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Nov 2024, 17:43 वाजता

उद्या आदित्य ठाकरेंची माहीममध्ये प्रचार सभा

 

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या मुंबईतील माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सभा घेणार आहेत. शिवसेना UBTचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी पोर्तुगीज चर्चजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसेचे उमेदवार आणि चुलत भाऊ अमित ठाकरे यांच्याविरोधात आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. राज ठाकरेंनी मागील आठवड्यात वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात सभा घेतली होती. विशेष म्हणजे कुटुंबातील उमेदवार असल्यानं शिवसेना UBT माहीम दादर मतदारसंघात प्रचार करणार नसल्याची चर्चा होती. मात्र उद्या या ठिकाणी आदित्य ठाकरेंची सभा होणार असल्यानं, या चर्चांना पूर्णविराम मिळालंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

11 Nov 2024, 16:20 वाजता

सत्ताधाऱ्यांना मोकळं रान असतं हे मान्य नाही- अमोल कोल्हे 

 

Amol Kolhe on Uddhav Thackeray : राष्ट्रवादी SPचे खासदार अमोल कोल्हे यांची बॅगही हेलिपॅडवर तपासली गेली. सांगलीतील विटा इथे वैभव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमोल कोल्हे आले असता, त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यावरुन कोल्हेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नियम असतात हे मान्य, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात, अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही, अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

11 Nov 2024, 15:56 वाजता

वणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी

 

Uddhav Thackeray : यवतमाळच्या वणीमध्ये उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा असताना, तिथे त्यांची यंत्रणेकडून बॅग तपासण्यात आली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बॅग तपासली गेली का, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचीही बॅग तपासणार का असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले. 

11 Nov 2024, 15:06 वाजता

माहीम कोळीवाड्यात सदा सरवणकरांना विरोध

 

Sada Sarvankar : मुंबईतील माहीम कोळीवाडा परिसरात प्रचारादरम्यान स्थानिकांनी सदा सरवणकर यांना विरोध केला..माहीम कोळीवाडा येथे राहणा-या स्थानिक कोळी महिलांचे फिश फूड स्टॉल विद्यमान आमदार सदा सरवणकरांनी हटवल्याने स्थानिक नाराज झाल्याचे दिसून आले..\ कोळी महिलांकडून झालेल्या आक्रोश आणि विचारलेल्या प्रश्नांना न उत्तर देताच सदा सरवणकर तिथून निघून गेले ....

11 Nov 2024, 14:45 वाजता

यशोमती ठाकूर यांचा राज ठाकरेंवर निशाणा

 

Yashomati Thakur On Raj Thacekray : आत्ताच्या राजकीय चिखलाला संविधानाची तोडफोड करणारे जबाबदार, असा पलटवार यशोमती ठाकूरांनी राज ठाकरेंवर केलाय. तर असं बेजबाबदार वक्तव्य राज ठाकरेंनी करू नये, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. झी 24 तासला दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर यशोमतींनी प्रत्युत्तर दिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 Nov 2024, 13:06 वाजता

माहीममधून विजयी होणार असल्याचा सरवणकरांना विश्वास

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघात तिरंग लढत होतेय.. सदा सरवणकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.. तर दुसरीकडे राज ठाकरेंची भेट घेण्यास मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं असं सदा सरवणकर म्हणालेत..