12 Nov 2024, 14:08 वाजता
मुंबई एअरपोर्टवर 3 किलोचं सोनं जप्त
Mumbai Airport Gold Seized : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन किलोचं सोन जप्त करण्यात आलंय. कस्टम विभागानं ही मोठी कारवाई केलीय. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत दोन कोटी २७ लाख रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे हे सोनं आढळून आलंय. त्याच्याकडे प्रत्येकी एक किलो वजनाच्या 24 कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा होत्या. तपासणीदरम्यान सोन्याच्या विटा सापडल्यात.
12 Nov 2024, 14:05 वाजता
मनोज जरांगेंचा पुन्हा सामूहिक उपोषणाचा इशारा
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू करा, असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला दिलंय. जालनाच्या अंतरवाली सराटीत जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणारेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तारीख जाहीर करणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलंय. तर हे भारतातलं सर्वात मोठं आमरण उपोषण असल्याचं जरांगेंनी सांगितलंय.
12 Nov 2024, 13:27 वाजता
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Nawab Malik : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. एका व्यक्तीनं मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीये.. वैद्यकीय कारणांसाठी देण्यात आलेल्या अंतरिम जामिनाचा मलिकांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय.. ईडीनं दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणी मलिकांना अटक झाली होती.. दरम्यान प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेच्या रिंगणात उतरलेत.. त्यामुळे त्यांच्याकडून अंतरीम जामीनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला...
12 Nov 2024, 13:18 वाजता
अजित पवारांचा वार, शरद पवारांचा पलटवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही लोकसभेत आमचा करेक्ट कार्यक्रम केला.. आम्ही ही करेक्ट कार्यक्रम स्वीकारला.. आमच्याच लोकांनी केल्यानंतर तो स्वीकारावा लागलाय.. पण आता विधानसभेत आम्हाला साथ द्या. असं आव्हान अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय..तर अजित पवारांच्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय.. निवडणुकींनंतर जनता उत्तर देणार असल्याचं शरद पवार म्हणालेत..
12 Nov 2024, 12:58 वाजता
सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा खेळ केलाय - प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar : सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा फुटबॉल केलाय, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलीय. यवतमाळच्या प्रचार सभेत आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं. तर सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा मान-सन्मान, प्रतिष्ठा संपवल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणावरून आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टावर निशाणा साधलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 12:43 वाजता
राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे - शरद पवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंची काल बॅग तपासण्यात आली होती.. त्यावरून शरद पवारांनी सरकारवर टीका केलीय.. सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणालेत.. तर मोदी, अमित शाह आणि शिंदेंच्याही बॅगा तपासा असं आदित्य ठाकरे म्हणालेत..
12 Nov 2024, 11:36 वाजता
संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोहोचलेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आलीये. यावरून राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय. दरम्यान निवडणूक आयोगावर निशाणा साधत, महिलांच्या पर्स तपासण्यापर्यंत मजल जातेय, अशी टीका राऊतांनी केलीय. तर निवडणूक आयोगानं निष्पक्षपातीपणानं तपासणी करायला पाहिजे, असं राऊतांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 11:13 वाजता
राज्यात आतापर्यंत 493 कोटी जप्त
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात 493 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीय. मुंबईत सर्वाधिक 183 कोटी जप्त करण्यात आले. तर बुलढाणामध्ये 6.59 कोटी, गोंदियात 5.53 कोटी, नागपुरात 37.53 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातूंचा यात समावेश आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 10:48 वाजता
उद्धव ठाकरेंच्या कोकणात 3 जाहीर सभा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकमेकांचे कट्टर विरोधी उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. उद्धव ठाकरे उद्या राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत.. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.. कणकवली आणि कुडाळमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे राणेबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..
12 Nov 2024, 10:12 वाजता
चंद्रपुरात देशी दारुचा साठा जप्त
Chandrapur Liquor Seized : निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरात देशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. कोरपना -अदिलाबाद महामार्गावर हा देशी दारुचा साठा जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर, आरटीओ विभाग, पोलीस आणि महसुल विभागाच्या अधिका-यांनी ही कारवाई केलीये. कारवाईत 485 देशी दारुच्या बाटल्यांसह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेलयंत.. तपासात ही देशी दारू ही बनावट असल्याची माहिती समोर आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -