12 Nov 2024, 09:11 वाजता
राज ठाकरेंचा मोदींच्या मुंबईतील सभेवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईत 14 नोव्हेंबरला होणा-या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी दिवाळीचे लाईट काढून टाकले, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. 14 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मोदींची सभा पार पडणारेय. यावरून राज ठाकरेंनी मोदींच्या सभेवर निशाणा साधलाय. दरम्यान दिवाळीच्या लाईटमध्ये मोदींच्या सुरक्षेचा काय संबंध, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 08:43 वाजता
मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभांचा धडाका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारसभेचा आजही धडाका पाहायला मिळतोय... एकनाथ शिंदे यांची बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आज सभा होणार आहे... तसेच दर्यापूरमध्येही मुख्यमंत्री शिंदेंची सभा पार पडणार आहे.. महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 08:17 वाजता
शरद पवार बरीच वर्षे म्हातारे होऊ नयेत - विनोद तावडे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवार बरीच वर्षं म्हातारे होऊ नयेत, त्यांनी आता नाही तर पुढील 5 वर्षं सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करावेत. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं नुकतंच एका प्रचार सभेत शरद पवार म्हणाले होते. तसंच सत्ता परिवर्तन केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यावर विनोद तावडेंनी ही प्रतिक्रिया दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 08:15 वाजता
देवेंद्र फडणवीसांची असदुद्दीन ओवैसींवर टीका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबईतल्या मालाडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी असदुद्दीन ओवैसींवर टीकास्त्र डागलंय...सून लो ओवैसी आम्ही पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवू असं फडणवीस म्हणालेत..यावेळी फडणवीस यांनी मविआवरही टीका केलीय... ओवैसी तुम्ही हैदराबादेत राहा इथं तुमचं काहीही काम नसल्याचं फडणवीस म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 07:46 वाजता
बिल्डरच्या घरातून अडीच कोटी जप्त
Navi Mumbai Cash Seized : नवी मुंबईच्या नेरुळमधून एका बिल्डरच्या घरातून तब्बल 2 कोटी 60 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या काळात इतकी मोठी बिल्डरच्या घरातून जप्त करण्यात आलीये. नेरुळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत ही 2 कोटी 60 लाखांची रोकड जप्त केलीय. ही रक्कम कोणत्या उद्देशानं घरात ठेवली होती, याचा तपास पोलीस करतायेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 07:43 वाजता
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक
Solapur Narsayya Adam Master : माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर काल रात्री दगडफेक झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केलाय. ते घरात नसताना हा प्रकार घडलाय. काही काळापासून काँग्रेस आणि माकप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं तणाव निर्माण झाल्याची माहिती आडम यांनी दिलीय. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप आडमांनी केलाय. दगडफेक करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या नरसय्या आडम मविआतून बंडखोरी करत माकपकडून निवडणूक रिंगणात आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 07:40 वाजता
मविआ नेत्यांच्या प्रचार सभांचा राज्यात धडाका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या नेत्यांच्याही राज्यात आज अनेक ठिकाणी सभा पार पडणार आहे.. राहुल गांधी यांची पहिली सभा दुपारी चिखलीत पार पडणार आहे.. तर दुपारी साडेतीन वाजता गोंदिया राहुल गांधींची सभा होणार आहे.. तर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा बार्शी आणि धाराशिवमध्ये पार पडणार आहे.. तर शरद पवारांचीही नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे.. दिंडोरी, निफाड, येवला, कोपरगाव आणि नाशिक पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 Nov 2024, 07:38 वाजता
राज्यात भाजप नेत्यांच्या प्रचाराचा धडाका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपचे केंद्रीय नेते आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा चंद्रपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे त्यानंतर मोदी संध्याकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे.. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची संध्याकाळी बोरीवली आणि घाटकोपरमध्ये सभा होणार आहे.. तर नितीन गडकरी यांच्याही आज अनेक ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.. देवेंद्र फडणवीस यांच्या डहाणू आणि रिसोडमध्ये सभा होणार आहे तर योगी आदित्य नाथ यांची अकोला, अमरावती नागपूरमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -