Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
27 Nov 2024, 10:15 वाजता
नाशिकमध्ये सीएनजी दरात 2 रुपयांची वाढ
Nashik CNG Price Hike : नाशिकमध्ये सीएनजी दरात दोन रुपयांनी वाढ झालीय.. अचानक वाढलेले सीएनजी दरामुळे नाशिककर संतप्त झाले आहेत... 89 रुपये 90 पैसे असलेला दर आता 91 रुपये 90 पैसे झालाय.. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत...
27 Nov 2024, 09:18 वाजता
प्रभादेवी आणि दादर परिसरात 2 दिवस पाणी बंद
Mumbai Water : मुंबईतल्या लोअरपरेल, दादर आणि प्रभादेवी भागात राहणा-या नागरिकांना दोन दिवस पाणी येणार नाहीय. मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यासाठी उद्या रात्री 10 वाजल्यापासून ते परवा रात्री आठवाजेपर्यंत पाणी येणार नाहीए. त्यामुळे 22 तास लोअरपरेल, दादर, प्रभादेवीतल्या काही परिसरांचा पाणी पुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: पाणीपुरवठा बंद असणार आहे. नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा, असं आवाहन पालिकेने केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 08:27 वाजता
डी.वाय.चंद्रचूड यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
D.Y.Chandrachud On Sanjay Raut : कोणत्या याचिकेवर सुनावणी करायचं हे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का? अशा शब्दांत माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील घडामोडीला चंद्रचूड जबाबदार आहेत. 12 आमदारासंदर्भात निर्णय देऊ शकले नाहीत. इतिहासात चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. याला चंद्रचूडांनी उत्तर दिलंय. सुनावणी करणं एखादा व्यक्ती ठरवणार का? असा सवाल उपस्थित करत. याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार सरन्यायधीशांना असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 08:09 वाजता
आदिती तटकरेंनी महेंद्र थोरवेंना सुनावलं
Raigad Aditi Tatkare : काठावर वाचलात जरा इकडं तिकडं झालं असतं तर काय जागा आहे ते कळलं असतं अशा शब्दात आमदार आदिती तटकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुनावलं.यश मिळालं तर त्याची हवा डोक्यात जाऊ देवू नका असा सल्लाही आदिती यांनी दिलाय. सुनील तटकरे यांनी माझ्यासह जिल्हयातील शिवसेनेचे तीनही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप करत आदिती तटकरे यांना पालकमंत्री होऊ देणार नाही असा इशारा आमदार थोरवेंनी दिला होता. त्यावत त्या बोलत होत्या. आपण थोरवेना फार महत्व देत नाही.कोण कुठला मंत्री होणार हे आमचे नेते ठरवत असतात हे कुणी स्थानिक आमदार ठरवत नाही असा टोलाही आदिती तटकरे यांनी थोरवेंना लगावला
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Nov 2024, 07:43 वाजता
काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक
Mumbai Congress Meeting : काँग्रेसनं आज मुंबईत नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावलीय. आजच्या बैठकीत गटनेता निवडला जाणारेय. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -