Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

3 Oct 2024, 15:00 वाजता

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार?

 

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांचं ठरलं...हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट...इंदापूरमधून उमेदवनारी बाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती....हर्षवर्धन पाटील भाजपला राम राम करून हाती घेणार तुतारी ?

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

3 Oct 2024, 14:18 वाजता

राज्यात अराजकता सुरू आहे - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तसेच अमित शाहांच्या आरोपांचाही समाचार घेणार असल्याचं ठाकरे म्हणालेत तसेच राज्यात अराजकता माजली असून ती मशाल हाती घेऊन संपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय... अराजकता संपवण्यासाठी ठाकरेंनी गाणं लॉन्च केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 14:15 वाजता

Manoj Jarange, Sambhajiraje, Laxman Hake : आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना पाडण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूये. मराठा समाजाच्या बैठकीत कुणाला पाडयचं याबाबत ठरणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं. तर जरांगेंनी पाडापाडी करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्ती आघाडीत यावं, असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. तर ज्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंना रसद पुरवलीय. अशा लोकांना पाडण्याचं धोरण ठरल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 13:43 वाजता

पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींसोबत अश्लील चाळे

 

Pune Crime : स्कूल बस मधून प्रवास करणा-या चिमुकल्यांसोबत बस ड्रायव्हरने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलाय... पुण्यातील वानवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडलीये.. याप्रकरणी संजय जेटींग रेड्डी या 45 वर्षीय बस ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलंय.. स्कूल बस मधून प्रवास करत असताना हा ड्रायव्हर पीडित मुलींना बसच्या पहिल्या सीटवर बसवायचा आणि त्यानंतर त्यांच्यासोबत छेडछाड करायचा. एका पीडित मुलीनं  तिच्या आईला हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर बस ड्रायव्हर विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील स्कूलबस पूर्व भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करते.

3 Oct 2024, 13:39 वाजता

मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान - संभाजी भिडे

 

Sambhaji Bhide : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलंय. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्तान, असं वक्तव्य भिडेंनी केलंय. सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत. ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणालेत. देशातील उत्सवांवरही त्यांनी भाष्य केलंय.. 

3 Oct 2024, 12:21 वाजता

दसऱ्यापूर्वी जागावाटप जाहीर होईल - संजय राऊत

 

Sanjay Raut : दस-यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिलीय.  महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवरही निशाणा साधलाय. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित  शाह  स्थानिक पातळीवर प्रचार करतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 11:13 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा

 

Nashik Raj Thackeray : मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5, 6 ऑक्टोबरला नाशिक दौ-यावर आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. नाशिकमध्ये सध्या मनसेची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पक्षांतर्गत वारंवार पदाधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातातेत. दरम्यानच्या काळात राज यांनीही नाशिकमधील संघटनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता नाशिक दौ-यावर येत आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 10:16 वाजता

राज्य सरकारची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' मोहीम

 

Ajit Pawar : महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून शक्ती अभियानाची घोषणा केली. त्या अंतर्गत 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' ही मोहीम राबवली जाणारेय. बारामती शहरात शक्तीपेटी तयार केली जाणारेय, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. यातून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील तक्रार स्वीकारण्यात येणारेय. मुलींनी तक्रार पेटीत तक्रारी कराव्यात, असं आवाहन अजित पवारांनी केलंय. यावेळी त्यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 10:10 वाजता

नागपुरातील शहर बससेवा ठप्प

 

Nagpur : ऐन सणाच्या दिवसांत नागपूर शहरातील बस सेवा ठप्प झालीये.. पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील 'आपली बस' या बस सेवेतील कर्मचा-यांनी संप पुकारलाय.. मोरभवन बसडेपोमध्ये कर्म-यांचं हे आंदोलन सुरु आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 09:51 वाजता

State Weather : राज्यात यंदा ऑक्टोबर हिटचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. राज्याती काही भागात उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.. तर मुंबईतही तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे.  सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं थंडीही अधिक पडणार आहे..  त्यामुळे ऐन दिवाळी थंडीहस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.. तर  मुंबई, पुण्यातून १० ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस  माघारी परतण्याचा अंदाज आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -