Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 03 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

3 Oct 2024, 11:13 वाजता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नाशिक दौरा

 

Nashik Raj Thackeray : मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5, 6 ऑक्टोबरला नाशिक दौ-यावर आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. नाशिकमध्ये सध्या मनसेची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पक्षांतर्गत वारंवार पदाधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातातेत. दरम्यानच्या काळात राज यांनीही नाशिकमधील संघटनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता नाशिक दौ-यावर येत आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 10:16 वाजता

राज्य सरकारची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' मोहीम

 

Ajit Pawar : महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून शक्ती अभियानाची घोषणा केली. त्या अंतर्गत 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' ही मोहीम राबवली जाणारेय. बारामती शहरात शक्तीपेटी तयार केली जाणारेय, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. यातून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील तक्रार स्वीकारण्यात येणारेय. मुलींनी तक्रार पेटीत तक्रारी कराव्यात, असं आवाहन अजित पवारांनी केलंय. यावेळी त्यांनी एक हेल्पलाईन नंबरही जारी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 10:10 वाजता

नागपुरातील शहर बससेवा ठप्प

 

Nagpur : ऐन सणाच्या दिवसांत नागपूर शहरातील बस सेवा ठप्प झालीये.. पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील 'आपली बस' या बस सेवेतील कर्मचा-यांनी संप पुकारलाय.. मोरभवन बसडेपोमध्ये कर्म-यांचं हे आंदोलन सुरु आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 09:51 वाजता

State Weather : राज्यात यंदा ऑक्टोबर हिटचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. राज्याती काही भागात उन्हाच्या झळा बसण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.. तर मुंबईतही तीव्र उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राज्यात यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे.  सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं थंडीही अधिक पडणार आहे..  त्यामुळे ऐन दिवाळी थंडीहस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.. तर  मुंबई, पुण्यातून १० ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस  माघारी परतण्याचा अंदाज आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 09:48 वाजता

पंतप्रधान मोदींचा 5 ऑक्टोबरला वाशिम दौरा

 

Prime Minister Narendra Modi Visit Washim : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला वाशिम दौ-यावर येणार आहेत. ते पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत. राज्य सरकारनं तयार केलेल्या विरासत-ए-बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणारेय. मोदींच्या दौ-याची मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 08:45 वाजता

शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात

 

Navratra : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. भाविकांनी तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. पहाटे 2 वाजता पारंपरिक विधी करुन देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.  9 दिवसाच्या घोर निद्रेनंतर, श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान झाली. सकाळी अभिषेक पूजा झाली. दुपारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना केली जाणारेय. महत्त्वाचे म्हणजे तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने इकडून तिकडे हलवण्यात येतेय.

3 Oct 2024, 08:20 वाजता

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

 

Pune Imtiaz Jaleel : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळं फासून विद्रुपीकरण केल्या प्रकरणी पुण्यातील कोंढवामध्ये जलील यांच्यासह MIM च्या पदाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 23 सप्टेंबरला सकाळी संभाजीनगर-जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा परिसरात पाटीला काळं फासण्यात आलं होतं. यावेळी समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देण्यात आल्या होत्या... याबाबत महेश भोईवार यांनी पोलिसांकडं तक्रार दिली होती तक्रार अर्जाची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण संभाजीनगर पोलिसांकडं तपासासाठी वर्ग करण्यात आलं. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 08:18 वाजता

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

 

Western Railway Megablock : पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे... चार तासांचा ब्लॉक असणार आहे..त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहे. तर काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहे.. आज रात्री साडेबारा वाजेपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे... ब्लॉक दरम्यान बोरीवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर धावणार आहे.. तर लांब पल्ल्याच्या गाडग्याही 10 ते 20 मिनिटं उशीरानं धावणार आहे..  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

3 Oct 2024, 08:01 वाजता

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

 

Delhi : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकऱणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.. गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी लांबवीवर पडतेय....

3 Oct 2024, 06:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कार्ला गडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास सुरुवात

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून आज सकाळी 8 वाजता कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.