29 Oct 2024, 22:22 वाजता
नवाब मलिकांचा प्रचार भाजप करणार नाही- आशिष शेलार
Ashish Shelar on Nawab malik : राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली. या अगोदरही देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका स्पष्ट केल्याचं शेलार यांनी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 20:43 वाजता
'संगमनेरला त्रास देणाऱ्यांना माफी नाही...', बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंना इशारा
Balasaheb Thorat on Sujay Vikhe : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता निशाणा साधलाय.. संगमनेरला त्रास देणा-यांना 23 नोव्हेंबर नंतर माफी नाही, तर शिर्डीतही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देणा-यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा थोरातांनी दिलाय...त्यामुळे अहिल्यानगरमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 20:14 वाजता
'काँग्रेसमधून आयात उमेदवारांना तिकीट देणं हे दुर्दैवी',रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना काँग्रेसमधून आयात उमेदवार करावे लागतात हे मोठं दुर्दैव आहे.. काँग्रेससोबत गेल्याचा उद्धव ठाकरेंना पश्चाताप होणार असल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलीये.. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन हुजरेगिरी करुन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोपही त्यांनी केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 18:39 वाजता
श्रीनिवास वनगा अद्यापही नॉट रिचेबल
Shriniwas Vanga : पालघरची उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले आमदार श्रीनिवास वनगा हे अजूनही नॉट रिचेबल आहेत...श्रीनिवास वनगा हे काल सात वाजेपासून आपल्या घरातून कोणाला न सांगता निघून गेले होते....या घटना जवळपास 22 ते 23 तास उलटलेले आहेत....अद्यापही वनगांसोबत संपर्क होऊ शकत नसल्याचं निकटवर्तीय आणि कुटुंबियांचं म्हणणं शिवाय पोलिसांनाही कुठलाही तपास लागलेला नाही.
29 Oct 2024, 18:21 वाजता
काहींनी आमच्यावर खटला भरून स्वत:च पक्षाचे मालक झाले- शरद पवार
Sharad Pawar on Ajit Pawar : काहींनी आमच्यावर खटला भरला आणि स्वत:चं पक्षाचे मालक झालेत.. उभ्या आयुष्यात कधीच कोर्टात उभा राहलो नाही, मात्र, काहींच्या उद्योगामुळे ते ही करावं लागलंय..राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवरून शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केलीये...
29 Oct 2024, 17:05 वाजता
नांदेडमध्ये 1 कोटींची रोकड जप्त
1 crore cash seized in Nanded : नांदेडमधील भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत तपासणीदरम्यान एका चारचाकी वाहनातून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये.. बोलेरो गाडीची तपासणी करत असताना लोखंडी पेट्यांमध्ये ठेवलेले एक कोटी पाच लाख रुपये पोलिसांना आढळून आलेत. या रकमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला पण वाहन चालक योग्य खुलासा देवू न शकल्यानं ही रक्कम पोलिसांनी जप्त केलीये.. याबाबत निवडणूक आयोगाला सुद्धा माहिती देण्यात आलीये.. पोलीस तपास करत आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 16:50 वाजता
शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल
Sharad Pawar on Ajit Pawar : बारामतीमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी अजित पवार यांची नक्कल केली...अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 16:13 वाजता
सिंचन भ्रष्टाचार फाईलचं अजितदादांनी उलगडलं गुपित
Ajit Pawar on Irrigation Scam : सिंचन योजनेतल्या 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या फाईलचं गुपित उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उलगडलं.आपल्यावर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि तशी फाईल तयार केली गेली....अजित पवारांची ओपन चौकशी करण्याबाबतची सही त्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली होती... त्या फाईलवर आर आर पाटील यांनी सही केली होती हे स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला दाखवलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
29 Oct 2024, 14:08 वाजता
शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Baramati Sharad Pawar : पंतप्रधान देशाचे असतात एका राज्याचे नव्हे...मोदींचं सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्र उद्योग धंद्यात एक नंबर होता त्यांचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर गेल्याचा आरोप शरद पवारांनी मोदींवर केलाय...अनेक प्रकल्प मोदींनी गुजरातला नेल्याच म्हणत शरद पवारांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.
29 Oct 2024, 12:47 वाजता
महायुतीत 3-4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती - फडणवीस
Maharashtra Election 2024 : महायुतीमध्ये तीन ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसांनी दिलीये..