Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

6 Sep 2024, 12:33 वाजता

'अजितदादांना मोदी दयेवर जगावं लागेल', विजय वडेट्टीवारांची टीका

 

Vijay Wadettiwar on Ajit Pawar : विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवारांना मोदी-शाहांच्या दयेवर जगावं लागेल, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केलाय. भाजपवाले जे देतील ते त्यांना घ्याव लागेल. कारणर भाजपनं अजित पवारांना गृहीत धरलंय, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. तर कोण किती जागा लढायंच यावर अजून चर्चा झाली नाही. केवळ जिंकण्यासाठी लढायचंय, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 12:00 वाजता

'विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी', अजित पवारांची भूमिका

 

Ajit Pawar On Seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागावाटपाबाबत रोखठोक भूमिका मांडलीये.. आम्ही विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी केलीये... पण त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे असं अजित पावारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय... आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत आलो आहोत. यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असा दावा यावेळी त्यांनी केला.. सध्या तिनही घटक पक्ष महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत चर्चा होईल असं ते म्हणाले.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 11:31 वाजता

JNPTमहामार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा

 

Maharashtra Longest Tunnel : बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आलाय. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. या बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलंय. या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणारेय. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणारेत.सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणारेत. बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 11:00 वाजता

 'मी देव झालो, असं स्वतः म्हणू नये', मोहन भागवतांचं वक्तव्य

 

Mohan Bhagwat :  मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवतांनी बौद्धिक घेतलं...पुण्यात पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.. यावेळी भागवतांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झालीये.. या वक्तव्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 10:25 वाजता

संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

 

Jitendra Awhad : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय. खोटी माहिती प्रसारित करुन शेतक-यांची दिशाभूल केल्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच चुकिची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 10:03 वाजता

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर 

 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आलीय. असं ट्विट फडणवीसांनी केलंय. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलीय. दुस-या क्रमाकावर कर्नाटक आणि तिस-या क्रमांकावर दिल्ली आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Sep 2024, 09:33 वाजता

'नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे असल्याचं दिसतंय', एकनाथ खडसेंची टीका

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपमध्ये प्रवेश झाला. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जर विरोध करत असतील तर ते जेपी नड्डांपेक्षा मोठे असावेत, असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केलाय. खडसेंनी महाजन आणि फडणवीसांचं नावं घेतल्यानं राजकारणात मोठी खळबळ उडालीय. प्रवेश झाल्याचं नड्डांनी जाहीर करावं, अशी मागणीही खडसेंनी केलीय. भाजप प्रवेश जाहीर करत नसेल तर त्यांना माझी गरज नाही, असं दिसतंय, असंही खडसे म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Sep 2024, 09:11 वाजता

'केंद्राची राज्याला सावत्र आईची वागणूक?', नाना पटोलेंचा सवाल

 

Nana Patole : केंद्र सरकार राज्याला सावत्र आईची वागणूक का देत आहे?, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारला केलाय. तेलंगणा, आंध्र प्रदेशातही पावसामुळे शेतक-यांचं नुकसान झालं. तिथं केंद्राची दोन मंत्रालये तैनात करण्यात आली. मात्र, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय? महायुतीचे नेते केंद्राकडे मदत का मागत नाहीत? असा सवाल पटोलेंनी ट्वीटरवरून केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

6 Sep 2024, 08:30 वाजता

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक

 

ZP School Teacher : राज्यातील जिल्हा परिषदांच्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आलाय.डी.एड., बी.एड. झालेल्या उमेदवारांची १५ हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणारेय.२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने याआधीच घेतला होता.मात्र, सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. त्यामुळे आता डी.एड., बी.एड. झालेल्या शिक्षकांना संधी देण्यात येणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

6 Sep 2024, 08:06 वाजता

उद्या मुंबई,ठाणे,रायगड,पालघरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

 

Rain Alert : गणरायाच्या आगमन सोहळ्यात पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.उद्यापासून सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यताय...