6 Sep 2024, 19:51 वाजता
महायुतीत कन्फ्युजन नाही - देवेंद्र फडणवीस
Nagpur Devendra Fadanvis : महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत कोणतंही कन्फ्युजन नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच चेह-यात महायुती निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचंही फडणवीस म्हणालेत.. भाजपचा पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षांचे नेते बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Sep 2024, 19:19 वाजता
अर्थ खातं हे सर्वात नालायक खातं - गुलाबराव पाटील
Jalgaon Gulabrao Patil : महायुतीतील वाद वाढण्याची शक्यता आहे...जळगावमधील कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरलीये...अर्थ खातं सर्वात नालायक खातं असल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणालेत...पाणी पुरवठी खात्याची फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली आणि परत आली...मात्र, पाठपुरावा सोडला नाही...त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात येणा-या काळात संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Sep 2024, 18:37 वाजता
विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Vinesh Phogat & Bajrang Punia Joins Congress : विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. हरियाणा निवडणुकीच्या अगोदर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आजचा दिवस काँग्रेससाठी मोठा असल्याचे केसी वेणुगोपाल यांनी म्हटलंय...
6 Sep 2024, 18:21 वाजता
संवेदनशील असतात ते माफी मागतात - फडणवीस
Nagpur Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेल्या माफीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते...त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय...जे संवेदनशील असतात ते माफी मागतात जे मुजोर असतात त्यांच्या ते कधी लक्षात येऊ शकत नाही...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Sep 2024, 17:09 वाजता
मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण
Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये एका वाहतूक पोलिसाला मद्यपी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केलीये..रिक्षा चालकाने एका तरुणीला रिक्षाची धडक दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले. मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला. काही वेळाने पुन्हा तो रिक्षा चालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला. यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आलीये. दरम्यान यातील मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुये.
6 Sep 2024, 16:10 वाजता
कॅबिनेटमधील कृती बहीण-भावाच्या नात्याचा अपमान - सुप्रिया सुळे
Supriya Sule : कॅबिनेटमध्ये झालेली कृती ही बहीण-भावाच्या नात्याचा अपमान असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीये...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून अजित पवार गटाविरोधात शिंदे गटानं कॅबिनेट बैठकीत आक्षेप नोंदवला...त्याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी टीका केलीये...
6 Sep 2024, 16:07 वाजता
माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरुन कॅबिनेटमध्ये जुंपली
Shambhuraj Desai : कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती..त्याला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिलाय...काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शिंदे गटानं अजित पवार गटाच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर आक्षेप घेतल्याचं समोर आलं होतं...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याने शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती...त्याला आज शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोराच दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
6 Sep 2024, 14:18 वाजता
'राज्यातील कंपन्या गुजरातला गेल्या', विजय वडेट्टीवारांचा आरोप
Vijay Wadettiwar vs Devendra Fadnavis : जे राज्य मागं आहे त्याला पुढं आहे म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही का? असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवारांना दिलंय. राज्यातल्या कंपन्या गुजरातला गेल्या. सर्व गुजरातकडं गहाण ठेऊन खूर्ची वाचवण्याचं काम राज्य सरकार करतंय, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. याला फडणवीसांनी उत्तर दिलंय. वडेट्टीवारांना गुजरातचं गुणगाण गाण्यात रस आहे. त्यांनी महाराष्ट्र पुढं गेलाय हे मान्य करायला हवं, अशा टोलाही फडणवीसांनी लगावलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
6 Sep 2024, 13:32 वाजता
'जयदीप आपटेला राऊतांनी लपवून ठेवलं होतं', देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Devendra Fadnavis on Sanjay Raut : जयदीप आपटेला राऊतांनी लपवून ठेवलं होतं, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर केलाय. जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर 8 दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायेत, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना काहीही बोलण्याची सवय असल्याचं फडणवीस म्हणाले.
6 Sep 2024, 13:01 वाजता
विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा चौघांवर
BJP Star Campaigners : विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धूरा चौघांवर-बावनकुळे...फडणवीस, गडकरी, बावनकुळे आणि दानवे सांभाळणार प्रचार...केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा प्रचारात विशेष समावेश...फडणवीसांसह गडकरी राज्यात पूर्णवेळ एक महिना प्रचार करणार...दानवेंसह संयोजन समितीमधील 21 नेते निवडणुकीच्या रिंगणात
बातमीचा व्हिडीओ पाहा-