Maharashtra Breaking News LIVE: राज-उद्धव एकत्र; कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे एकत्र

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात खातेवाटप जाहीर झालं आहे. राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर 

 Maharashtra Breaking News LIVE: राज-उद्धव एकत्र; कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे एकत्र

Maharashtra Breaking News LIVE: फडणवीस सरकारने शनिवारी रात्री अखेर खातेवाटप जाहीर झाले आहे. आज राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा जाणून घेऊया एका क्लिकवर 

22 Dec 2024, 12:04 वाजता

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं आज लग्न आहे. दादरच्या शिवाजी विद्यालयात हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थीत आहेत. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे समर्थक वाट बघत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही दोघे एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली होती. मात्र दोघांची राजकीय युती काही होताना दिसत नाही. असं असलं तरी हे दोन्ही नेते कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळालं आहे. 

22 Dec 2024, 11:45 वाजता

शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला फोन 

पुण्यात भीमथडी यात्रेत शरद पवार सहभागी झाले आहेत. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन लावला आहे. पुण्यातील भीमथडी जत्रेचे ही आमंत्रण फोन द्वारे दिले आहे. त्यानंतर जत्रेतील दुकानदारांची पाहणी शरद पवारांनी सुरू केली आहे. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्री यांच्यासोबत शरद पवारांनी चर्चा केली आहे 

22 Dec 2024, 11:11 वाजता

कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांची पुन्हा कोलांटी उडी??

माजी आमदार के पी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा के पी पाटील यांच्याकडून घरी येऊन सत्कार केला आहे. के पी पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. या निवडणुकीत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी के पी पाटील यांचा पराभव  केला आहे. निवडणुकी आधी  महाविकास आघाडीत गेलेले केपी पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चा आहेत. 

22 Dec 2024, 10:49 वाजता

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर घडामोडींना वेग आला आहे. हे हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार आहेत. तसेच केसच्या संपूर्ण तपासासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांची नेमणूक करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. 

22 Dec 2024, 10:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  खातेवाटपानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी

सातारा खातेवाटप झाल्यानंतर लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी येताउत. हा त्यांचा खाजगी दौरा असून देवदर्शनासाठी ते गावी येत असल्याची माहिती मिळते आहे. दुपारी साडेबारा वाजता ते दरेगावी पोहोचतील त्यानंतर त्यांचा गावी मुक्काम असेल.

22 Dec 2024, 10:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत

रत्नागिरी- रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत. मुंबई गोवा महामार्गातील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी निवळी ग्रामस्थ आक्रमक. निवळी येथे उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर. हा पुल रद्द करून येथे जमिनीवरूनच महामार्ग तयार करण्यात यावा. या बाजारपेठ परिसरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड देखील केला जावा

22 Dec 2024, 09:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज-उद्धव ठाकरे आज पुन्हा एकत्र दिसणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षाचे समर्थक वाट बघत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा जोर धरू लागली होती. मात्र दोघांची राजकीय युती काही होताना दिसत नाही. असं असलं तरी  हे दोन्ही नेते कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र आले होते. आज देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र येणार आहे.

22 Dec 2024, 08:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ 

पुण्यावरून बँकॉकला जाण्यासाठी एअर इंडिया एक्स्प्रेसने पुणे ते बँकॉक ही सेवा सुरू केली आहे. पुणे ते बँकॉक हे विमान आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी पुण्यातून उड्डाण घेतील.

22 Dec 2024, 08:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: अखेर खातेवाटप जाहीर, शिवसेनेला कोणती खाती? 

शिवसेनेकडे कोणती खाती

एकनाथ शिंदें- नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
प्रताप सरनाईक – वाहतूक
शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
दादा भुसे – शालेय शिक्षण
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
संजय राठोड – मृदा व जलसंधारण
संजय शिरसाट – सामाजिक न्याय

शिवसेनेचे राज्यमंत्री
योगश कदम – ग्रामविकास, पंचायत राज
आशिष जैस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

22 Dec 2024, 08:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वनक्षेत्राच्या वाढीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी 

देशभरातील वनक्षेत्रात वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.