Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पुढं नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार, राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांची पुढची चाल काय असणार याकडे सर्वांचच लक्ष राहील. याशिवाय राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय यासंदर्भातील सर्व लहानमोठ्या अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर....
16 Dec 2024, 15:47 वाजता
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या आकडा वाढला
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या आकडा वाढला आहे. अपघातातील मृतांचा आकडा आठ वर गेला आहे. फजलू शेख नावाच्या जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते.अपघातात आत्ता पर्यंत आठ जणांचा मृत्यू तर ४१ जखमी झाले आहेत.
16 Dec 2024, 15:32 वाजता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असतील. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
16 Dec 2024, 15:21 वाजता
पद्मसिंह पाटील यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली.डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याची त्यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टर पद्मसिंह पाटील मुंबईतच आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून पाटील पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
16 Dec 2024, 14:56 वाजता
धुळे शहरात एसटी बसवर दगडफेक
परभणीच्या घटनेचे पडसाद धुळे शहरात उमटले आहेत. धुळे शहरात एसटी बस वर दगडफेक झाली आहे. नाशिक शहादा या बस वरती दगडफेक झाली असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. आज्ञात पाच ते आठ जणांकडून दगडफेक झाल्याचा दावा चालकाने केला आहे.
16 Dec 2024, 14:09 वाजता
कलाविश्वाचा ताल चुकला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली
भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
16 Dec 2024, 13:33 वाजता
एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्याला 50 हजारचा दंड
महाराष्ट्र सरकारने अदानी पॉवरला वीज पुरवठ्यासाठी दिलेले कंत्राट हा "घोटाळा" होता असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच कंत्राट देताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्ट कारभारात गुंतले होते, असाही आरोप रिट याचिकाकर्त्याने केला होता. या याचिकाकर्त्यावर मुंबई हायकोर्टाने 50,000 रुपये दंड रुपये ठोठावला आहे.
16 Dec 2024, 13:01 वाजता
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंड दोघांनाही मिळालं मंत्रीपद पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्री पद मिळालेले आहेत त्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते पालकमंत्री व्हावं यासाठी मागणी करताना दिसत आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचीही समर्थक आपापला नेता पालकमंत्री व्हावा यासाठी बोलताना दिसत आहेत बीड जिल्ह्याचे राजकारनात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मागील काही वर्ष एकमेकांच्या विरोधात होते मात्र आता त्यांच्या मनोमिलना नंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले त्यामुळे आपला नेता हा पालकमंत्री झाला पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
16 Dec 2024, 11:49 वाजता
महायुती मधील तिन्ही पक्षातील तुटक समन्वयांवर विजय शिवतारे नाराज
मंत्रीपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे नाराज. विधानभवनात सही करून पुरंदरला निघून जाणार असं केलं स्पष्ट. नाराजी व्यक्त करण्यासाठी अधिवेशनात थांबणार नाही असं म्हणत महायुती मधील तिन्ही पक्षातील तुटक समन्वयांवर विजय शिवतारेंनी व्यक्त केली नाराजी.
16 Dec 2024, 11:45 वाजता
मंत्रिमंडळात जयंत पाटील यांची वर्णी?
मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही मंत्रिमंडळाची एक जागा शिल्लक आहे. त्याच जागेवरती जयंत पाटील येतील, असा विश्वास विधानपरिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला.
16 Dec 2024, 11:42 वाजता
सिद्धिविनायकासंदर्भातील कोणत्या प्रस्तावाला मंजुरी?
तुकडा बंदी कायद्याच उल्लंघन करुन ज्यांनी बांधकाम केल आहे. यावेळी रेडीरेकनरच्या 25 टक्के रक्कम घेतली जात होती. ही आता 5 टक्के घेतली जात असल्याच विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं आहे. प्राचीन स्मारक व अवशेष संदर्भातील विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान, सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर आता 3 वर्षांऐवजी 5 वर्षे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब.