Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पुढं नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार, राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांची पुढची चाल काय असणार याकडे सर्वांचच लक्ष राहील. याशिवाय राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय यासंदर्भातील सर्व लहानमोठ्या अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर....
16 Dec 2024, 11:45 वाजता
मंत्रिमंडळात जयंत पाटील यांची वर्णी?
मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही मंत्रिमंडळाची एक जागा शिल्लक आहे. त्याच जागेवरती जयंत पाटील येतील, असा विश्वास विधानपरिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला.
16 Dec 2024, 11:42 वाजता
सिद्धिविनायकासंदर्भातील कोणत्या प्रस्तावाला मंजुरी?
तुकडा बंदी कायद्याच उल्लंघन करुन ज्यांनी बांधकाम केल आहे. यावेळी रेडीरेकनरच्या 25 टक्के रक्कम घेतली जात होती. ही आता 5 टक्के घेतली जात असल्याच विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं आहे. प्राचीन स्मारक व अवशेष संदर्भातील विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान, सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर आता 3 वर्षांऐवजी 5 वर्षे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब.
16 Dec 2024, 11:10 वाजता
मोठी बातमी! जोतिबा मंदिर धोक्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाडी रत्नागिरी इथल्या डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे डोंगराचा परिसर त्याचबरोबर मंदिराला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेने रीतसर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल घेतल्यानंतर जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन थांबविण्यात आले आहे . असे असले तरी बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कोणत्याही घटकांवर अद्याप कारवाई करण्यात आलेले नाही. त्यामुळेच प्रशासनाचे अधिकारीच या पाठीमागे आहेत का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
16 Dec 2024, 10:44 वाजता
छगन भुजबळांची नाराजी कशी दूर होणार?
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते छगन भुजबळ यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी भुजबळांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यामुळे आता त्यांची नाराजी नेमकी कशी दूर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
16 Dec 2024, 10:20 वाजता
महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहीत नाही- भास्कर जाधव
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत नक्की महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहीत नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं. ते म्हणाले, 'कारण असं आहे की तुम्ही संपूर्णपणे जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये मंगळवार, गुरुवार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करावी लागते वीस विधेयकं आहेत. वीस विधेयकांच्यावर तुम्ही चर्चा कधी करणार आणि वीस विधेयकांच्या चर्चा तुम्ही करणार त्यानंतर नवीन सदस्यांचा परिचय मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला नवीन मंत्र्यांचा परिचय, शोक प्रस्ताव अशा प्रकारचे विषय जर बघता या विदर्भामध्ये केवळ पाच दिवसांचा किंवा सहा दिवसांचा अधिवेशन घेऊन नेमकं विदर्भाच्या पदरामध्ये हे सरकार काय टाकणार?'
16 Dec 2024, 10:16 वाजता
शपथविधी आणि छगन भुजबळ यांच्याविषयी काय बोलले हसन मुश्रीफ?
'काल मी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा मला आणि माझ्या मतदारसंघात आनंद आहे. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दाखवली ती मी उत्तमरीत्या पार पाडेन', असं मुश्रीफ म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी वक्तव्य करताना 'भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आम्ही सगळे त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू . आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय करायचं हे ठरवलं असेल असं मला वाटतं', असं हसन मुश्रीफ म्हणाले.
16 Dec 2024, 09:36 वाजता
राज्य सरकार बिनखात्याचं सरकार- संजय राऊत
राज्य सरकार बिनखात्याचं सरकार, कुणाचं खातं कुठलं काहीही पत्ता लागत नाही असं म्हणत राजकारण कर्माची फळं भोगावी लागतात अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
16 Dec 2024, 09:08 वाजता
नाशिक, निफाड गारडलं...
नाशकात पुन्हा वाढली थंडी. आज नाशकात 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडी पासून बचावासाठी शोकट्याचा आधार. तर, निफाड मध्ये थंडीचा पारा घसरला. 5.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला पारा. येवला, लासलगाव परिसरात देखील थंडीची हुडहुडी. नागरिकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर तसेच शेकोट्यांचा आधार.
16 Dec 2024, 08:44 वाजता
भाजीपाल्याचे दर घटले
कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात 0 ते 15 टक्क्यांनी घट झालीये. घाऊक बाजारात अचानक आवक वाढल्याने दर कमी झालेत. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये परराज्यातून 90 ट्रक आणि स्थानिक भागातून 40 टेम्पो आवक झालीय. मार्केट यार्डमधील आवक वाढल्याने दर कमी करण्यात आलेत.
16 Dec 2024, 08:29 वाजता
PMPLच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
PMPLच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता. 706 कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ केली जाणार असल्याची माहिती. निर्णयाआधीच नागरिकांचा कडाडून विरोध.