Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पुढं नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार, राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांची पुढची चाल काय असणार याकडे सर्वांचच लक्ष राहील. याशिवाय राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय यासंदर्भातील सर्व लहानमोठ्या अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर....
16 Dec 2024, 08:24 वाजता
मंत्रिमंडळ विस्तारात 7 जिल्हे वंचित; राजकीय वर्तुळात नाराजीचा नवा अध्याय
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती,वाशिम व अकोला या जिल्ह्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले आहे. तर नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री. यवतमाळ मध्ये ही तीन मंत्री पद आलेय. तर वर्धा आणि बुलढाणा येथून एक मंत्रीपद मिळाल आहे. शिंदे मंत्रिमंडळात चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली जिल्ह्यातून बावधर्मारावाबा आत्राम मंत्री होते.
16 Dec 2024, 08:18 वाजता
दारू पिण्यासाठी दिलेल्या उसण्या 100 रूपयांसाठी मित्रानेच मित्राची केली हत्या
दारू पिण्यासाठी उसने दिलेल्या शंभर रुपयांची मागणी करत शिविगाळ केल्याचा राग मनात धरत मित्रानेच मित्राची डोक्यात दगड घालून निर्घृरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे घडलाय, यात बाळू पोखरकर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी राहुल गुळवे या आरोपीस नारायणगाव पोलिसांनी अटक केलीय, या प्रकरणाचा पुढिल तपास आता नारायणगाव पोलीस करत आहेत.
16 Dec 2024, 08:13 वाजता
परभणीचा पारा खालावला
परभणीच तापमान 4.1 अंश सेसल्सिअसवर. या हिवाळ्यातील निच्चांकी तापमानाची नोंद. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात झाली नोंद. मागील 5 दिवसापासून सतत होतेय तापमानात घट.
16 Dec 2024, 08:10 वाजता
16 Dec 2024, 08:04 वाजता
सत्ताधारी, विरोधकांमध्ये संघर्ष...
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. काल नव्याने शपथविधी झालेल्या मंत्र्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहाच्या सदस्यांना करून देतील तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात येणार आहे माहिती सरकारचं भरभक्कम बहुमत आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांची कमी झालेली संख्या या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये काय संघर्ष होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल.
16 Dec 2024, 07:43 वाजता
राज्यातील थंडीचा जोर वाढला
राज्यातील थंडीचा जोर वाढलाय. अनेक शहरांमध्ये पारा 10 ते 15 अंशांच्या पातळीवर खाली आलाय. निफाड तालुक्यात थंडीचा प्रचंड कडाका जाणवतोय. ओझरमध्ये रविवारी 3.8 अंश इतकं किमान तापमान नोंदलं. तर धुळ्याचा पारा 4 अंशांपर्यंत आलाय. मराठवाडा, विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झालीय. येत्या काही दिवसांत थंडी नवीन विक्रम नोंदवेल आणि डिसेंबर महिना सर्वाधिक थंड महिना ठरू शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?
16 Dec 2024, 07:33 वाजता
आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय..
आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनात 20 विधेयक मांडण्याची शक्यता असून महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता.
16 Dec 2024, 07:33 वाजता
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी संघटनेचं आंदोलन
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या निषेधार्थ, नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी संघटनेनं आंदोलन केलं. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. तर मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न मिळाल्यानं त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. अनेक भुजबळ समर्थकांनी साहेब सांगतील तीच दिशा अशा आशयाचं स्टेटस त्यांच्या मोबाईलवर ठेवलंय.