सायकलवरील ताबा सुटल्यानं तरुणाचा मृत्यू
मीरारोडमध्ये सायकलवरील ताबा सुटल्याने 16 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघाताची घटना CCTV मध्ये चित्रित झालीये. भरधाव वेगानं सायकलवरून येणाऱ्या एका तरूणाचा भींतीला धकडून मृत्यू झाला. या संदर्भात काशीगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
2 Nov 2024, 13:33 वाजता
राज ठाकरेंनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही-पवार
तेव्हा उभ्या आयुष्यात कधी जातीवादी राजकारण केलं नाही. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे.
2 Nov 2024, 12:07 वाजता
राज्यात सत्तापरिवर्तन करायचंय - शरद पवार
नुकतीच शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवार म्हणाले, 'राज्यात सत्तापरिवर्तन करायचं आहे. केवळ राजकारण केल्यानं प्रश्न सुटत नाही. केंद्राच्या रॅंकिगमध्ये राज्य पहिल्या पाचमध्ये नाही. विकास करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली पाहिजे. राज्यात परिवर्तनाचा निर्धार करायचा आहे. एकत्र मिळून आपण परिवर्तन आणू शकतो. आपल्याला राज्यला योग्य मार्गावर आणायचंय. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केला नव्हता.'
2 Nov 2024, 11:27 वाजता
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 19 आगीच्या घटना घडल्या
पिंपरी चिंचवड शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी 19 आगीच्या घटना घडल्या. बहुतांश आगीची कारणं फटाके असल्याचं समोर आलंय. सुदैवानं अग्निशमन दल आणि नागरिकांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही..
2 Nov 2024, 11:27 वाजता
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन गट महा विकास आघाडीला देणार साथ
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन गटाने महा विकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड, सुभाष पवार आणि काँग्रेसचे नेते परिषदेला उपस्थित राहतील.
2 Nov 2024, 10:39 वाजता
एकनाथ शिंदे संकुचित मनाचे, मनसेची टीका
श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्याची राजू पाटील यांची इच्छा नव्हती, पण तरी त्यांच्यासाठी काम केलं. आज परतफेड करायची वेळ आली तर अशी भूमिका घेत आहेत हे कपटी आहेत. एकनाथ शिंदे संकुचित मनाचे असं यशवंत किल्लेदार म्हणाले आहेत.
2 Nov 2024, 10:29 वाजता
हायटेक कंपनीमध्ये भीषण आग
साताऱ्याच्या कवठेमधील हायटेक कंपनीमध्ये भीषण आग लागली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्यानं आग आटोक्यात आणण्यात यश आल्याचं समोर आलंय.