Prakash Ambedkar Emotional Appeal: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यायत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणे,मतदारांच्या घराघरापर्यंत जाणे अशी कामे जोमाने सुरु आहेत. निवडणुकीच्या धामधमुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. ऐन निवडणूकीच्या तयारीत आपल्याला दिशा दाखवणारा नेता रुग्णालयात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपले कार्यकर्ते, नेते आणि मतदारांसाठी खास संदेश जारी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांची नुकतीच अँजिओप्लस्टी झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या धामधुमित प्रकाश आंबेडकर यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे प्रकाश आंबेडकर यांनी आलं एक व्हिडिओ जारी केलाय. यात ते मतदारांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल, असा संदेश यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले आहे. निवडणुकीला सुद्धा सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवले जाणार आहे. एससी आरक्षण अमंलबजावणी होणार आहे. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, 'दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा,' असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे.