संभाजीनगर, विशाल करोळे आणि अमर काणे 'प्रतिनिधी' : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. गेल्या तीन ते चार दिवसांपासून फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांना झेडप्स सुरक्षा आहेत. मात्र गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर त्यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आलीये. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरूय. आपलं सरकार आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसलीय आहे. अशातच आता प्रचाराचा धुरळा उडायला सुरूवात झालीय. या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीये. पोलिसांसह आता फोर्सवन कमांडोंचं पथकही फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलंय. गेल्या तीन ते चार दिवसांपासून फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये.
फडणवीसांची सुरक्षा का वाढवली?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली आहे. जीवाला धोका असल्याचा गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात म्हटलं आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर सुरक्षा वाढवली आहे. त्यासोबतच सुरक्षेमध्ये CPT च्या दोन टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेत फोर्स वनचे 6 कमांडो वाढवले आहेत. सुरक्षेसाठी SPO च्या दोन टीमही वाढवण्यात आल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक महत्वाचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकांमुळे त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि चाहत्यांची गर्दी होत आहेत. अशातच त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.