Breaking News LIVE Updates: मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, महायुतीचं सरकार येणार - अमित शाह

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates: मी आज महाराष्ट्राचा निकाल सांगतो, महायुतीचं सरकार येणार - अमित शाह

12 Nov 2024, 11:43 वाजता

राहुल गांधींनी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने उड्डाण घेतलं मागे परतले कारण...

राहुल गांधी दिल्लीहून विमानाने छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. संभाजीनगर येथून ते बुलढाणा येथे जाणार होते. मात्र विमानात तांत्रिक अडचण आल्याने राहुल गांधी यांना संभाजीनगर येण्यापूर्वी पुन्हा दिल्लीकडे परतावे लागले आहे. त्यांचा दौरा दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

12 Nov 2024, 11:05 वाजता

उद्धव ठाकरे राणेंच्या बालेकिल्ल्यात! राणेंच्या मुलांबद्दल काय बोलणार?

नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. एकमेकांचे कट्टर विरोधी उद्या एकमेकांसमोर येणार आङेत. उद्या उद्धव ठाकरे यांच्या कोकणात तीन सभा होणार आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या सभा होणार आहेत. कणकवली आणि कुडाळ येथे नितेश राणे आणि निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राणेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष? उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभेतून कोणाला करतील लक्ष्य आणि कोणावर लक्ष?

12 Nov 2024, 10:24 वाजता

नाशिकमध्ये गावगुंडाकडून पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

नाशिक शहरात गुंडगिरीने गाठला कळस, पंचवटी थेट पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले प्रकाश नेमाने यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रकाश नेमाने कर्तव्यावरून घरी जात असताना त्यांनी गावगुंडांना हटकवले आणि या गावगुंडांना त्याचा राग आल्याने त्यांनी थेट दगडाने मारहाण केली. प्रकाश नेमाने हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आङेत. नेमाने यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात थेट पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला झालल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे.

12 Nov 2024, 08:18 वाजता

मुंबईकरांनो, स्वत:ला जपा! मलेरिया आजारांचं घोंघावतं संकट

मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी 22 नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मलेरिया झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. मुंबईसह राज्यभरात सगळीकडे साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर सगळीकडे डेंग्यू, मलेरिया, कावीळ इत्यादी आजारांचे रुग्ण वाढू लागेल आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. मलेरिया झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडते.  बीएमसी आरोग्याकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 6419 लोकांना मलेरियाची लागण झाली आहे. मलेरिया हा साथीचा आजार असून दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते.

12 Nov 2024, 07:45 वाजता

मोदी पुण्यात येणार असल्याने शहराला छावणीचं स्वरुप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील पुण्यात तैनात करण्यात आलेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तास तैनात राहणार आहे. सभा होत असलेल्या मैदानावर 1000 पेक्षा अधिक पोलीस तैनात असतील. 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 23 सहायक पोलीस आयुक्त, 135 पोलीस निरीक्षक, 570 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. 

12 Nov 2024, 07:45 वाजता

शिवाजी पार्कमधील लाईट काढल्याने राज ठाकरे संतापले

दिंडोशीमधील जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावरुन देखील निशाणा साधला. आपण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी करतो. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कवर आपण 14-15 वर्षांपासून दीपउत्सव साजरा करतो. मात्र काल अचानक सगळे लाईट बंद करुन टाकले. 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कला सभा आहे. त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असं राज ठाकरेंनी सांगितले. 

12 Nov 2024, 07:45 वाजता

राज ठाकरे पुण्यात घेणार 2 सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पुन्हा सभा घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी राज ठाकरेंच्या पुण्यात दोन सभा घेतील. खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे यांच्या पुण्यात सभा होतील. या आधी कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

12 Nov 2024, 07:37 वाजता

मोदींच्या सभेनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय तर आज सायंकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत प्रमुख रस्त्यांवर वाहनेत लावण्यास मनाई करण्यात आली आहे. जंगली महाराज रस्ता, शास्त्री रोड, फर्ग्युसन रस्ता, टिळक रोड या मार्गांवर कोणत्याही प्रकारचे वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. आज सायंकाळी पाच ते सहा यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस. पी. कॉलेज मैदानावर सभा होती त्यासाठी शहरात चोख बंदोबस्त ही तैनात करण्यात आले आहे.

12 Nov 2024, 07:36 वाजता

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईत आज तीन प्रचार सभा

चांदिवली, भांडुप आणि विक्रोळीत सायंकाळी होणार सभा

माधुरी हॉटेल व गुरुदेव मेडिकल, साईबाबा मंदिर मार्ग, मोहिली व्हिलेज, पाईप लाईन, साकीनाका, चांदिवली येथे सायंकाळी पाच वाजता होणार जाहीर सभा. 

90 फिट रोड, खडी मशीन, भांडूपमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता तर कन्नमवार बस डेपो जवळ, बिल्डिंग 139, विक्रोळी पूर्व येथे रात्री आठ वाजता तिसरी सभा होईल.

12 Nov 2024, 07:36 वाजता

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे फोटो लावून...; राज ठाकरेंचा टोला

सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिंडोशीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. बाळासाहेबांचे फोटो लावून मतं मागतात उद्धव ठाकरे. उध्दव ठाकरे पंजाचा प्रचार करतात. काँग्रेस, पवार गट बाळासाहेबांचं नावही घेत नाही, असा टोला राज यांनी लगावला.